पान:विश्व वनवासींचे.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या लोकसाहित्यातून घडते. ही लोकसाहित्याची जुनी आणि समृद्ध परंपरा आहे. त्यांचे नाच गाणे म्हणजे जगणेच असते. त्यांचे जगणे हीच कला आहे; आणि त्यांच्या लोककला हेच जीवन आहे.

वनवासींच्या लोककथा

 लोकसाहित्यात ग्रामीण लोकमानस साक्षात झालेले असते. जात्यावरच्या ओव्या, खेळगीते, सण, उत्सव, गीते, विविध नाच, जागरण, दंडार, भारूड, गोंधळ इत्यादी प्रसंगानुकूल गीते या लोकसाहित्यात वास्तवरुपात प्रतिबिंबित झालेले असते. लोककलांचालोकवाद्ये, लोकनृत्ये, लोकश्रद्धा यांचा समावेश लोकसाहित्याची महत्त्वाची अंगे म्हणून करता येतो. मांदोळ, नाच, काज, थाळगान, बोहाडा, लगीनगीत, गौरीगीत, भोंडल्याचा नि टिपऱ्यांचा नाच, मर्तिक नाच, तोरण व सवण, डोंगरच्या मावल्या, डाका, तारपा, हस्तकला, चित्रकला, ढोलनाच यांची गणना लोककलात होते.

 गाईच्या शेणानं सावरलेल्या कुडाच्या लिंपलेल्या भिंती असलेल्या झोपड्यांवर तांदळाच्या पीठाने रेखाटलेली ही चित्रकला वारली पेंटीग्ज म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात रेखांचे सामर्थ्य, प्रत्ययाला येते. बांबूच्या, घायपाताच्या धाग्यातून विणलेल्या टोपल्या, चटया, टोप्या, पिशव्या वनवासींच्या हस्तकलेचे नमुने आहेत. त्यातही सूक्ष्मता आणि कमालीचे सौंदर्य आहे. त्यांची कोडी, कूटे, नृत्यकला आणि त्यातील कसरतीचे खेळ अनुभवण्यासारखे आहेत.

वनवासींची लोकनृत्ये आणि वाद्ये

 वनवासींच्या जीवनामध्ये एकूणच लोकसाहित्याला आणि त्यातल्या त्यात लोकगीतांना फार महत्त्व आहे. ही लोकगीते जीवनातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या घटनाप्रसंगांना आणि संस्कारांना उद्देशून रचलेली आहेत. वनवासी निसर्गपूजक असल्यामुळे आणि कृषी हेच त्यांचे जगणे असल्यामुळे ते पावसाला ‘परमेसर' मानतात. धान्य पिकवणाऱ्या जमिनीला 'धरतरी' शेतीकामात उपयोगी पडणाऱ्या गायत्रीला 'गावतरी'तर कणसाला 'कणसरी' अशा देवताच मानतात. चंद्र, सूर्य, वीज, ढग हे सारेच त्यांना पूजनीय देव आहेत. कणसरी या अन्नधान्य देणाऱ्या

वनवासी लोकसाहित्याचे स्वरूप

२३