पान:विश्व वनवासींचे.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुलला, पळसाला केशरी रंगाची फुले आली तर मग पावसाळा सुरू होणार. वारूळाच्या वरच्या कंगोऱ्यावरून उत्तर दक्षिण दिशा होकायंत्रासारखी ते ओळखतात. या वनवासींच्या समजूती अभ्यासनीय ठराव्यात.

वनवासी लोकसाहित्यातील 'देशी' पणा

 वनवासी लोकसाहित्यातील पाळेमुळे खणून काढली, शोधली तर त्यात अस्सल देशीवादाची प्रचिती अभ्यासकाला येऊ शकेल. प्रतिक्रिया म्हणूनच देशीपणा साहित्यात अवतरत असतो. परकी संस्कृती संघर्ष त्याला कारणीभूत असतो आणि अशा संघर्षाला वनवासी लोकसमूहाने निश्चितच सामना केला असेल. त्या परकीय संस्कृतीच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून आपल्या देवदेवता, आचार-विचार संस्काराच्या कल्पना, श्रद्धा, अंधश्रद्धा, आपल्याला अवगत असलेल्या पारंपरिक विद्या एतद्देशीय म्हणून भारतीय संस्कृतीशी असलेले नाते, जोडली गेलेली नाळ स्पष्टपणे या वनवासी लोकसाहित्यात अवश्य जपली असली पाहिजे. याची उदाहरणे अनेक देता येतील. वनवासींच्या लोकसाहित्यात ती प्रतिबिंबित झालेली आहे. 'देशी'पणाची आवाहकताही या साहित्यात आढळते. या लोकसाहित्याच्या आकलनासाठी समाजशास्त्रीय दृष्टिकोण आणि समीक्षा पद्धती विशेष उपयुक्त ठरू शकेल. मग या साहित्यातून देशी सत्त्वाचा प्रत्यय घेता येईल. देशीवादाच्या स्वीकाराने हे आकलन अधिक चांगले होईल असे वाटते.

 अडाणी गरीब दरिद्री असला तरीही कोणताही माणूस एकाकी, आयसोलेटेड, संस्कृती विरहित जीवन जगू शकत नाही. यास्तव धर्मविधी, देवदेवता, ग्रामदेवता निर्माण करून त्यांना आपल्या श्रद्धा आणि निष्ठा वाहाव्या लागतात. वनवासींनी आपले जीवन सुसह्य करण्यासाठी ग्रामदेवता मानलेल्या दिसतात. ग्रामदैवत अख्ख्या गावाचे होते. पाड्यावरही त्याची यात्रा भरते. उत्सव होतो. या ग्रामदैवताचा त्याने स्वत:ला धाक घालून घेतलेला आहे. दुष्काळ, बर्बादी टळून पीकपाणी यावे म्हणून तो ग्रामदेवताला भजत असतो. त्याआधारे हितसंबंधही जपले जातात. भाबड्या मनाला विराम मिळतो. ग्रामदेवतांच्या उत्सवात कोठेही भेदभाव नसतो. भस्मदेव, मरीमाता, वराई माता, वाघदेव, शिवल्या देव, नागदेव, खंडोबा, आसरा, भैरोबा, दुल्हादेव,

वनवासी लोकसाहित्याचे स्वरूप

२१