पान:विश्व वनवासींचे.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अभिप्राय

 (डॉ. गिरधारी यांच्या 'आरसा आदिवासी जीवन शैलीचा' या पहिल्या वनवासीविषयक ग्रंथावरील अभिप्राय)

 “आपले २७ लेख पोटात घेणाऱ्या “आरश्या (आरसा आदिवासी जीवन शैलीचा) मध्ये वनवासी जीवनाचे प्रायः सर्वांगीण चित्र दिसते आहे हे मात्र सत्य आहे.

 आपण जव्हार परिसराचा विशेष केंद्र म्हणून अभ्यास केलात तर ठाणे जिल्ह्यातील वनवासी जातींचा सर्वांगीण परिचय आमच्यासारख्यांसाठी उपलब्ध करून दिलात.

 वनवासींचे सण, उत्सव, त्यांचे संस्कार इत्यादींचे 'चक्षुर्वै सत्यं' दर्शन घडवेल असा आरसा वाचकांपुढे ठेवलात.

 आपण अनेकानेक वनवासी विद्यार्थी घडवलेत, त्यांच्यासाठी ग्रामीण परिसरात वर्षानुवर्षे राहिलात, त्यांच्या जीवनशैलीचा डोळसपणे अभ्यास करून समान धर्त्यांसाठी त्याचा सारांश ग्रंथबद्ध केलात हे सारे काम कोणी पगारी माणूस करू शकेल असे नाही. समाजपुरुषाची निरपेक्ष सेवा करण्याची आस ज्यांच्या मनात जागृत होते तेच कार्यकर्ते असले कार्य करू शकतात.”


(आदरणीय यशवंतराव लेले,

संस्थापक सदस्य, ज्ञान प्रबोधिनी यांच्या पत्रातून)

२० राष्ट्रीय वैशाख, शके १९३९

***
१६०
विश्व वनवासींचे