पान:विश्व वनवासींचे.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राम-लक्ष्मण अशी ठेवतो. शिवाय वनवासींमध्ये पुरुषांची दशरथ, शत्रूघ्न, लक्ष्मण अशी तर स्त्रियांत कौशल्या, सुमित्रा, सीता अशी नावे लोकप्रिय आहेत.

 रामायणातील जोहार म्हणजे नमस्कार या अर्थी वनवासी वापरतात. भिल्ल जातीत तो रूढ आहे. गावचा प्रमुख यालाही ते मुंडा म्हणजे गाव प्रमुख म्हणतात.

 जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सगळे वनवासींचे संस्कार हिंदू जीवनपद्धती प्रमाणेच आहेत. दोन्हीमध्ये समानता आहे. नामकरण, कान टोचणे, विवाह, एवढेच काय अंत्यसंस्कार यात साम्य आहे. वनवासींनी राम, कृष्ण, शिव आदि सर्वच देव देवतांना आत्मसात केले आहे.

 त्यांची व्यक्तिनामे पहा, उदा:- रामदयाल मुंडा, कार्तिक ऊराव, कृष्ण मार्डी या महापुरुषांची ते पूजा करतात. हा रामायण-महाभारताचा प्रभावच आहे.

 हिंदू विश्वातील अलौकिक अदृश्य शक्तीला ईश्वर मानतात. त्याच्या साकार रुपाची पूजा बांधतात. आमचे वनवासी बांधवही असाच विचार करून परमेश्वराची निराकार रुपात पूजा करतात. त्यात 'डोंगऱ्या देव' म्हणजे महादेव, राम, मारुती, कृष्ण, लक्ष्मी हे सगळेच येतात. वनवासींच्या लोकगीतातून-लोककथातून-लोकविद्येतून याची साक्ष पटते.

 वनवासी देवीची श्रद्धेने अर्चना करतात. वनवासींमध्ये रामनवमी उत्सव रूढ आहे. ते भक्ती भावाने रामनवमीला रामाचा रथ पाड्यापाड्यातून मिरवतात. सीतेची हरणाची चोळी वनवासी महिला पूज्य मानतात. सीता वनात होती याचा या वनवासी स्त्रियांना अभिमान आहे. काही अनुसूचित जामातीत चोळी घालत नाहीत याचे कारण सीतामाईची आठवण आहे. दिवाळीत हरिणाची पूजा करतात.

 वनवासी रामायण, महाभारत या महाग्रंथाना पवित्र मानतात. राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत यांना आपले मानून ते रामायणात रमतात. त्यांचा राम शबरीची बोरे आवडीने खातो. त्यांचा लक्ष्मण साचे रक्षण करतो. सीता त्यांच्या सोबत गीते गाते. कंदमुळे हाच

१५८
विश्व वनवासींचे