पान:विश्व वनवासींचे.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वाळुटी झिरा खोदला पाणी प्यायला

   तहान भागवायला

 खिल्लारी जोडी घेतली शेती करायला

   धान वाढवायला

 उलुशी गाडी घेतली माल वाहायला

   बसुनी हिंडायला.

iv) पेरणी नृत्य गीत

  नांगराचा फाळ जमिनीचा काळु

  फोडली धर्तरी कन्सरी

  पेरली कन्सरी पिकवा येवली नागली

  पिकाना लोवली हारडाना (पाखरानी) खादली

  गेवनी गोफनी करितो राखणी

 अशी असंख्य उदाहरणे लोकगीताच्या संदर्भातील आपल्याला निर्देशित करता येतील. असा हा लोकसाहित्याचा सर्वांगीण अभ्यास करता येईल. या लोकसाहित्यात वनवासी लोकसंस्कृती समावलेली आहे.

***


लोकसाहित्याच्या अभ्यासाची नवी दिशा

१५५