पान:विश्व वनवासींचे.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शिवाय वारुळाच्या टोकांवरून होकायंत्रासारखी उत्तर दक्षिण दिशा ओळखणे, पक्षाने झाडावर घरटे बांधले यावरून पावसाचा कमी, मध्यम, भरपूर असा अंदाज घेतात. धान पेरून किती, कसे उगवते, यावर पावसाचा, पीकचा अंदाज घेतात किंवा मुंग्या अंडीवर नेऊ लागल्या, की भरपूर पाऊस पडेल हे समजते. असे त्यांचे काही खास आडाखे अभ्यसणीय आहेत. या काही नव्या दिशेने संशोधन होणे गरजेचे आहे.

लोकगीतांचे काही नमुने

i) अंगण (अकोला) येथील आदिवासी लोकगीत :

 जनी जाते ओ शेणाला । उभा पाठिमागे काना ।

 जने येऊ दे गं मला । शाण वेचू लागेन तुला ।

 घालून पितांबराची काच । शाण येच चहु बाज ।

 शाण वेचून बांधली म्वाट । काना देता मोटला ग्वाट ।

ii) संत तुकोबा जीजाईचा हा संवाद :

 तुकाराम बोल - । जीजा कुकू लाव उभा ।

 आला विमाईन । बसून जाऊ दोघा ।

 तुकाराम बोल । जीजा कुकू लाव टिकला ।

 आला विमाईन । कसा जाऊ मी एकला ।

 तुकाराम बोल । जीजा तू माझी बायकू ।

  इमानात जाया । नको जनाच आयकू ।

 तुकाराम बोल । जीजा इमानात चाल ।

 माग राहिल्यान । होतील तुझे हाल

iii) ठाकरांचे नृत्य गीत :

  उलुशी माडी बांधली मला राहायला

  दिवा लावायला

 उलुशी गाय घेतली, जीव लावायला

  दूध खायाला


१५४
विश्व वनवासींचे