पान:विश्व वनवासींचे.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काठखेळ, धांदरी, घुसारी, दांडिया रास इत्यादी.

८) लोकसमज

 मंत्रतंत्र, जादुटोणा, साप विंचू उतरविणे, कावीळ, मूठ मारणे, दूध उडविणे, पायरव होणे, घास उतरविणे, दृष्ट काढणे, काळी विद्या इत्यादी.

९) लोकविधी

 विवाह, मौज, काज, आसरा, पाचवी, षष्ठी, ग्रामदैवत विधी इत्यादी.

१०) आदिवासींच्या जाती

 वारली, कोकणा, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, क ठाकूर, म ठाकूर, कातकरी, कोलाम, माडिया गोंड, कोरकू, परधान, धोती, पावरा, तडवी, दुबळा, मावची, भिल्ल, पारधी इत्यादी.

१०) आदिवासींचे देव

 कडेवर बाळ घेतलेली 'मेठू', हातात कणिस नागलीचे घेतलेली 'कणसरी', घागळी वाद्यासहित 'कनसऱ्या', हातात चाटू म्हणजे लाकडी ओगराळे घेतलेली 'काळी लक्ष्मी', हातात दिवा असलेली 'गोरी लखमी', हातात मुसळ असलेली 'मुसळखांबी', हाती काठी, पाठी ढोल, डोकी टोपी 'बरमा', पाचनंदी, पाच बंजारा 'नंदिपट्टा', मोरपिसांचा मोठा गुच्छ त्याला कळंबाचा खुंटा 'हिरवा देव', तीन लिंगी आंगठी शेपूट 'चिता', सोन्याची उभी लहान मूर्ती 'बालवीर', उभी मूर्ती 'रघ्या, हरिभगत', हातात काठी 'बाळदी', घोड्यावर स्वार, हाती लांब तलवार 'बहिरोबा', घोड्यावर स्वार सोबत स्त्रिया 'खंडेराव', वाघावर बसलेली 'भवानी', पार्वतीसह नंदीवर स्वार 'महादेव', एका हातात काठी दुसऱ्या हातात लोटा 'रानवा', गावा शेजारी लाकडी खुंट 'चटा', 'पांढरदेव', 'नारायणदेव', 'दुल्हादेव', बडादेव', 'मुंजा', 'रानेताण'.

लोकसाहित्याच्या अभ्यासाची नवी दिशा

१५३