पान:विश्व वनवासींचे.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२) लोकनृत्ये

 तारपा, ढोलनाच, थाळगान, बोहाडा, कोंबडनाच, अभिचार नृत्ये त्यात देवतासंचार, अष्टमीच्या घागरी कुंकणे, गजीनृत्य, मांदोळ, गौरीनाच, आंबानाच, लगीननृत्ये, डोंगरच्या भावल्या, डिंडण इत्यादी.

३) उत्सव सण

  नागपंचमी, पोळा, दिवाळी, दसरा, आखातिजा, शिमगा, होळी, कवळी भाजी, बीजा, गुढीपाडवा इत्यादी.

४) लोकगायक

 संबळ वाजविणारा 'गोंधळी', डमरूच्या साथीने भैरवाची स्तुती करणारा 'भराडी', सूर्योदयी पावा वाजविणारा 'वासुदेव', विविध सोंग वठविणारा 'बहुरूपी', खंजिरी, तुणतुणे-पुतळी वाजविणारे 'वाघ्यामुरळी', भोपे, कडक लक्ष्मी, पोतराज, लावणी, पोवाडे गाणारे शाहीर, जोगते, भुत्या, सोंग, भांड इत्यादी.

५) लोकविद्या

 यात भगताला, जाणकाराला अवगत असलेले औषधोपचार वनौषधीचे ज्ञान यालाच 'लोकवैद्यक' म्हणतात. आजीचा बटवा, घुटी, मूर्तिकला, विणकाम, भरतकाम, कशिदा, नक्षीकाम, हात न उचलता रांगोळी काढणे इत्यादी.

६) लोकवाद्ये

 डाका, नाल, तुणतुणे, संबळ, डफ, खंजिरी, वाजंत्री, सनई, वेणू, पावा (बासरी), शिंग, तुतारी, चिपळ्या, ढोल, ढोलकी, ताशा, तबला, डग्गा, मृदुंग, डमरू, तारपा, पावरी, नगारा, घांगळी, तिलबुली, हिरोबाई, किंझरी, राजेंगी बाणा इत्यादी.

७) लोकक्रीडा

 सूरपारंब्या, विटीदांडू, चेंडूफळी, आट्यापाट्या, झिम्मा, फुगडी, आगोटा-पागोटा, गोफ, पिंगा, तळ्यात-मळ्यात, दहिहंडी, लेझीम,

१५२
विश्व वनवासींचे