पान:विश्व वनवासींचे.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वाती : पडतील स्वाती, त पिकतील मोती.

मराठी महिने

चैत्र : 'चैत' म्हणजे 'दैत'

ज्येष्ठ : 'जेठ' अन् ‘पाण्याची भेट'

भाद्रपद : ‘भादवा' अन् 'हांडी मडकी' वाजवा

पौष : 'पूस' करी 'हूस' । थंडीन पाडीन भूस

माघ : माही करी जीवाची लाही । महो हिवाचा लाहो.

 'माही बीजा, कोंबडी शिजा ।

 पोशा पोशांनो, उगाच निजा ॥'

आजही सर्वत्र -

 पिंपळ, वड, आंबा, बेल, औदुंबर, आवळा, तुळस यांना वंद्य मानण्याची प्रथा आहे. पिंपळाचे झाड तिथे पाणी असते.

 लोकसाहित्यात सामाजिक परंपरा पिढ्या न् पिढ्या जतन केल्या जातात. तो माणसांच्या जीवनातील आविष्कार असतो. लोकसाहित्यात कालपरत्वे आणि प्रदेश परत्वे थोडा बहुत फरक होत असतो. आजच्या ललित साहित्याच्या आकलन मूल्यमापनालाही लोकतत्त्वीय दृष्टिकोणाची नितांत गरज आहे. कारण 'लिपी'चा शोध लागेपर्यंत लोकमनाचे सगळेच आविष्कार मौखिक होते. केवळ Oral Transmission मधून सगळे लोकसाहित्य आपल्यापर्यंत येऊन पोहचलेले आहे. त्यामध्ये लोककला, लोकनृत्ये, लोकविद्या, लोकगायक, लोकक्रीडा, लोकवाद्ये, लोकविधी आणि लोकसमज, लोकवैद्यक, लोकजाती, लोकदैवत आदींचा समावेश होतो. उदाहरणार्थ-

१) लोककला

 गोंधळ, देवीचा जोगवा, खंडोबाचे जागरण, पांगूळ, भारूड, ललित, कहाण्या, दशावतार, नमन, खेळे, यक्षगान, विदर्भातील दंडार, मराठवाड्यातील खडी गंमत, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, तमाशा, पोवाडा, पथनाट्य, कीर्तन इत्यादी.

लोकसाहित्याच्या अभ्यासाची नवी दिशा

१५१