पान:विश्व वनवासींचे.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'लोकसाहित्य' अभ्यासाची निष्पत्ती

 लोकसमूहमनाने जागवलेले, मौखिक परंपरेने स्मृतीत जतन केलेले अलिखित स्वरूपातील हे वाङ्‍‍मय आहे. त्यात सामुदायिक कृती आहे. परंपरेने चालत आलेले, लोकभाषेत व्यक्त केलेले ते लोकमानस आहे. 'लोक' म्हणजे एकाच प्रकारच्या सांस्कृतिक जडण घडणींचा मानव समूह. लोकसाहित्याचा अभ्यास बहुस्पर्शी आहे. त्यामध्ये शब्द, लोककला, क्रीडा आणि लोकविधी आहेत. पर्यावरण वाचक म्हणी, कृषिसंस्कृती जपणाऱ्या आहेत.

उदा. : 'झाड तठ वारा । पडती पाण्याच्या धारा'

 'तण खाई धन',

  'जळो पण पिको'

  'वावरात पिकू दे, आमचे पोट भरू दे'

 'माय माझी तू । घरात सोनं पडू दे'

  'होळी जळली, थंडी पळाली'

  'फडका घे सूडका घे....सूट ।

 'कणगीत दाणा त भील (गडी) उताणा ।

 'पोट हाय संग त काय पडल मांग.

उखाणे : आरवत कोंबडा, तरंगत जाय

 चार शिंग - आठ पाय (नांगर)

 (शेतकरी, (२बैल) ४ शिंग, ८ पाय)

मराठी नक्षत्रावरच्या म्हणी

मृग : मृगाच पाणी, आबादाणी

आद्रा : पडतील अर्दडा त भरतील नदी गरदडा (नदी डोह)

(पौष) पुष्य : पूस, करी हूस । पाडीन थंडीन भूस

मघा : पडतील मघा, नाहीतर वरती बघा

उत्तरा : नाही पडतील उतरा, त हाल खाईना कुतरा

दस्त : पडला हाती, त करील अन्नाची माती

{


विश्व वनवासींचे
१५०