पान:विश्व वनवासींचे.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

iv) महादेव कोळी समाजातील (दिंडोरी तालुका) लोककथा : एक

 अभ्यास (संगीता गवारी, २००९)

vi )आदिवासी समाजातील ढोलनृत्याची गाणी : एक अभ्यास (पेठ

 तालुक्याच्या संदर्भात) (बाळू घुट)

vi) कळवण व सुरगाणा तालुक्यातील कोकणा जमातीतील लोकनृत्य

 संस्कृतीचे दर्शन : सर्वांगीण अभ्यास (रामदास कोल्हे)

vii) ठाणे जिल्ह्यातील आदिवासी ठाकूर समाजाच्या लोकगीतांचा

 चिकित्स अभ्यास (प्रा. हिरालाल लोखंडे/२००९)

viii) आदिवासी साहित्याची प्रेरणा स्वरूप व चिकित्सा :

 उल्का निंबाळकार

 असे अनेक विषय संशोधनात मान्यता पावले आहेत. महाराष्ट्रातील बरेच जिल्हे आणि तालुके यादृष्टीने अभ्यासता येतील. लोकसंस्कृतीचे प्रतिनिधी किंवा उपासक यांचे अभ्यास या लोकसाहित्याच्या दृष्टीने अभ्यसनीय आहेत. मराठवाड्यातील किनवट, पुणे, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, ठाणे, पालघर, जव्हार, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यातील तालुक्यांपर्यंत अद्याप पोहचावयाचे आहे. आदिवासीमधील 'क' ठाकूर, 'म' ठाकूर जमातींच्या बोलींचा अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या लोकसाहित्य आणि लोकविद्यांच्या अभ्यासाच्या निमित्ताने लोकसंस्कृतीचा फार मोठा वारसा जपला जाईल. त्यातून अनेक फलदायी गोष्टी निष्पन्न होतील. भारतीय आणि महाराष्ट्र संस्कृतीचा हा अमोल (आणि अनमोल) ठेवा आहे. त्याच्या विचिकित्सक बुद्धीने अभ्यासाची खरी गरज आहे. या होणाऱ्या अभ्यासाचे निष्कर्ष संकलित झाल्यावर त्याचा एक चांगला प्रभाव जनमानसावर उमटू शकेल. लोकसाहित्याची समृद्ध परंपरा, वनवासी जमातींच्या लोकसाहित्याचे वेगळेपण, एकेका जमातीचा विषयवार अभ्यास हे विषय अभ्यासले गेले पाहिजेत. त्यातून भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा हाती येईल . आणि विशाल मानवी सौहार्दाचा माणुसकीचा प्रत्ययच घडेल.

लोकसाहित्याच्या अभ्यासाची नवी दिशा

१४९