पान:विश्व वनवासींचे.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण स्वतंत्रपणे हेच प्रकरणांचे उपविषय घेऊन अधिक सखोल आणि शोधक दृष्टीने काम होणे महत्त्वाचे व उपयुक्त ठरू शकेल. कित्येक बोली, त्यातील शब्दकळा संशोधक दृष्टीने अभ्यासण्याची गरज तीव्र आहे. मराठी भाषेचा प्रवाह रुंद आणि संथ-समृद्ध होण्यासाठी या अभ्यासाची गरज आहे. त्याची उदाहरणे देता येतील. उदा: उगवती म्हणजे पूर्व दिशा, मावळती म्हणजे पश्चिम दिशा. सोमवार गोडा दिवस, मोडा दिवस मंगळवार, फार मोठे शब्दभांडार या बोलींमध्ये साठवलेले आहे. स्वदेशी धन म्हणून तर आपल्याला या लोकसाहित्याचे जरूर कुतूहल आहे पण आता विदेशी अभ्यासकही मराठी शिकून या लोकवाङ्मय क्षेत्रात पर्यावरण रक्षणाच्या पूर्वापार चालत आलेल्या संकेतांचा - संशोधक दृष्टीने अभ्यास करीत आहेत कारण या सामग्रीतून पर्यावरण, कृषि व्यवस्थापन, हस्तकला, नृत्यकला, संस्कृतीची उदात्तता इत्यादी विषयांवर मौलिक बोध करून घेता येईल याची संशोधकांना खात्री पटलेली आहे.

मान्यताप्राप्त संशोधन : काही विषय

 लोकसाहित्याचे आंतरज्ञानशाखीय अभ्यासही होऊ शकतात. ते वाङ्‍‍मयीन, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, भाषाशास्त्रीय, तत्त्वज्ञानविषयक, सौंदर्यशास्त्रीय, देशीवादी, लोकतत्त्वीय अशा विविध अंगांनी करता येणे संभवते. या अभ्यास संशोधनाची उपयुक्तता विशेष आहे.

i) महादेव कोळी समाजातील लोकसाहित्याचा वाङ्‍‍मयीन

  दृष्टिकोणातून अभ्यास. (गोपाळ गवारी : २००९)

ii) मालेगाव तालुक्यातील भिल्ली लोकसाहित्याचा चिकित्सक

 अभ्यास. (जीजा सोनवणे, २००६)

iii) जागरण, गोंधळ : एक चिकित्सक अभ्यास. (संगीता

 कढणे, २००७)


१४८
विश्व वनवासींचे