पान:विश्व वनवासींचे.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभ्यासातून साकार करण्याचा प्रयत्न करता येण्याजोगा आहे.

लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृतीचा अभ्यास

 या लोकसाहित्याच्या अभ्यासात लोकसंस्कृतीचा म्हणजेच लोकजीवनाचा अभ्यास अनस्यूत आहे. लोकजीवनापासून लोकसाहित्य अलग करता येत नाही. त्यात सारी लोकसंस्कृती सामावलेली असते; म्हणून लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी, संशोधकांनी लोकसाहित्याच्या विविध प्रकारांच्या निमित्ताने होणाऱ्या अभ्यासातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले पाहिजे. लोकजीवन संस्कृती हे त्यांचे लक्ष्य असले पाहिजे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांचे अतूट नाते जाणून घेऊनच हा अभ्यास होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारच्या अभ्यासातून आज समाजात, जीवनात निर्माण झालेल्या किंवा होणाऱ्या कितीतरी प्रश्नांचा उलगडा होऊ शकेल. लोकजीवनाची खऱ्या अर्थाने उकल होऊ शकेल. ही या अभ्यासाची खरी महती आणि गुणवत्ता आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासाचे खरे खुरे उद्दिष्ट हेच आहे. यामुळे त्या त्या काळातील समाजामध्ये रूढ असलेल्या ज्ञानाचा शोध घेता येईल. आजच्या नव्या संदर्भात त्या ज्ञानाचा पाठपुरावा करून त्यात नवी भर टाकता येईल. ते ज्ञान पुढे वाढवता येईल आणि त्याचा सांप्रत समाजाला लाभ होऊ शकेल. आजच्या विज्ञान विषयक ज्ञानालाही नवी दिशा प्राप्त होऊ शकेल. याचे एकच उदाहरण महणजे लोकसाहित्यातून प्रतीत होणारे महत्त्वाचे ‘पर्यावरण रक्षणाचे भान'. आज ‘पर्यावरण संरक्षण' हा परवलीचा शब्द झाला आहे. याचे अगाध ज्ञान या लोकसाहित्यात साठविलेले बाहेर काढता येईल. खुले होईल.

 यासाठीच केवळ 'लोकसाहित्या'साठी विविध संज्ञा वापरलेल्या आसाव्यात. लोकसाहित्याला 'लोकसंस्कृती', 'लोकविद्या', 'लोकवाङमय', folk culture'-'folk literature', 'folk-Art' म्हणून ओळखले जात. त्यामागचे रहस्य हेच आहे. या प्रकारच्या संज्ञांमधून लोकसाहित्याची व्याप्ती, सर्वसमावेशकता आपल्याला कळ शकते. लोकवैद्यक, लोकनृत्य, लोकचित्रकला, लोककला, नक्षीकाम, वारली पेंटींग्ज, वाद्ये, रंग,

लोकसाहित्याच्या अभ्यासाची नवी दिशा

१४५