पान:विश्व वनवासींचे.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६. प्रमाण मराठी : पण तुम्ही त्यासाठी शिकायचे मनावर घ्या.

 कोकणी : पण त्येसाठी तुम्ही शिकायचा मनावर घ्ये.

 वारली : पण त्यासाठी तू शिकायच मनावर घे.

 ढोरकोळी : पण त्यासाठी तू शिकायच मनावर घ्या.

६७. प्रमाण मराठी : माझे जर तुम्ही ऐकल नाहीतर पुढे

 तुम्हाला पश्चाताप, दुःख होईल.

  कोकणी : माझा जर तुम्ही आयकला नाय तर पुढा

 तुम्हालं पकाताप, दुःखी हुईल.

 वारली : माझा जर तुम्ही आयकला नाय तर पुढ

 तुम्हाल दु:ख होईल. वाईट वाटल.

  ढोरकोळी : माझा तुम्ही आयकल नाय तर पुढा

 तुम्हाल दु:ख होईल.

६८. प्रमाण मराठी : आता तुम्ही सरळ घरी जा.

 कोकणी: आता तुम्ही नीट घरी जा.

 वारली : आता तू सिधा घरी जा.

 ढोरकोळी : आता तुम्ही सरळ घरी जा.

६९. प्रमाण मराठी : सकाळी लवकर उठत जावे.

  कोकणी : सकाळचे लौकर उठत जेस.

 वारली: सकाळी लवकर उठत जा.

 ढोरकोळी : सकाळी लवकर उठत जा.

७०. प्रमाण मराठी : दिवसभर चांगले काम करीत जावे.

 कोकणी : दिसभर चांगला काम करत जाय.

 वारली: दिवसभर चांगल काम करत जा.

 ढोरकोळी : दिसभर चांगला काम करायचा.

 यातून संबंधित शिक्षकांना समाजातील वनवासींना ग्रामीण विद्यार्थ्यांशी चांगला सुसंवाद साधता येईल याची खात्री वाटते. शिक्षकांनी हे भान राखल्यास निश्चितच वनवासी समाजातील मुलांना शिकावे वाटेल. म्हणून हा प्रयोग केला आहे.

***
१४२
विश्व वनवासींचे