पान:विश्व वनवासींचे.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६०. प्रमाण मराठी : चुगली कधी करू नये. ऐकू नये.

 कोकणी : चहाडी कधी करायची नाय, आयकायची नाय.

 वारली : वाईट कधी करू नको, ऐकू नको.

 ढोरकोळी : चुघली कधी करायची नाय, ऐकायची नाय.

६१. प्रमाण मराठी : शिकल्याने खूप फायदे होतात.

 कोकणी : शिकशिल तर फायदा हल.

 वारली : शिकल्यानं खरेच फायदे होतात.

 ढोरकोळी : शिकलेल्या माणसाचा फायदा होतो.

६२. प्रमाण मराठी : आपल्याला मान मिळतो.

 कोकणी : आपलेलं मान मिळतत.

 वारली : आपलेले मान मिळतो.

 ढोरकोळी : आपल्याला मान मिळतां.

६३. प्रमाण मराठी : आपल्याला पैसा ही मिळतो.

 कोकणी : आपलेले पैसेही मिळतत.

  वारली: आपलेलं पैसे भेटतो.

 ढोरकोळी : आपल्यालं पैसे मिळतात.

६४. प्रमाण मराठी : आपण मग गरीब राहात नाही.

 कोकणी : आपण मग गरीब राहाणार नाही.

 वारली : आपले गरीब राहात नाय.

 ढोरकोळी : आपण मग गरीब राहत नाय.

६५. प्रमाण मराठी : आपल्याला चांगले कपडे घालून ऐटीत

 फिरता येते.

  कोकणी : आपलेलं चोघलं कपडं घालून रूबाबात

 हिंडता येते.

 वारली : आपलेलं चांगलं कपडं घालून रूबाबात

 फिरता येते.

  ढोरकोळी आपल्यालं चांगले कपडे घालून

 पद्धतशीर हिंडाय मिळतं.


वनवासी प्राथमिक विद्यार्थी सुसंवाद

१४१