पान:विश्व वनवासींचे.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४. प्रमाण मराठी : सहलीला तुम्ही सगळे येणार ना?

 कोकणी : सहली तुम्ही आंखी येसालना?

 वारली : सहलीलं तुम्ही सगळे जण येणार ना?

 ढोरकोळी : सहलीलं तुम्ही सगळे जण येणार ना?

५५. प्रमाण मराठी : आज किनई मी तुम्हाला खूप छान गोष्ट

 सांगणार आहे.

  कोकणी : आज मी तुम्हालं फार बेस गोठ सांगीन.

 वारली : आज काय नाही तुम्हाला मी चांगल्या गोष्टी सांगणार आहे.

 ढोरकोळी : आज तुम्हाला खरी गोठ सांग तू.

५६. प्रमाण मराठी : नेहमी कोणत्याही मोठ्या शिकलेल्या

 माणसाचे ऐकत जावे.

 कोकणी : कधीही मोठ्या शिकेल माणसाचा आयकाचा.

 वारली: हमेशा कोणत्याही शहाणा सिकलेला माणसाचे ऐकाव.

 ढोरकोळी : नेहमी कोणत्याही मोठ्या सिकलला माणसाचे ऐकाव.

५७. प्रमाण मराठी : घरातल्या माणसाचे ऐकत जावे.

 कोकणी : घरातले माणसाचा आवकायचा.

  वारली : घरातले माणसाचा ऐकत जाव.

 ढोरकोळी : घरातले माणसाचा आयकत जाव.

५८. प्रमाण मराठी : खोट कधी बोलू नये.

 कोकणी . : खोटा कधी बोलायचा नाय

  वारली : खोटा कधीही बोलू नाही.

 ढोरकोळी : खोटा कधी बोलायचा नाय.

५९. प्रमाण मराठी : चोरी कधी करू नये.

 कोकणी : चोरी कधी करायची नाय.

  वारली : चोरी कधी करू नये.

  ढोरकोळी : चोरी कधी करायचा नाय.

१४०
विश्व वनवासींचे