पान:विश्व वनवासींचे.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४७. प्रमाण मराठी : आज तुला कोणी रागावले का?

 कोकणी : आज तुला कोणी झगडला काय?

 वारली : आज तुला कोणी रागावलं काय?

 ढोरकोळी : आज तुला कोणी रागावल काय?

४८. प्रमाण मराठी : तू मला आज नाराज का दिसतोस?

 कोकणी : तूल आज बेस नाही का?

  वारली : तू माल आज दु:खी का दिसतोस?

 ढोरकोळी : तू आज मालं नाराज का दिसतोस?

४९. प्रमाण मराठी : तू अभ्यास नीट करत जा बरे.

 कोकणी : तू अभ्यास बेस करतोस.

  वारली : तू अभ्यास नीट करत जा बरं.

 ढोरकोळी : तू अभ्यास चांगला करत जा बरं.

५०. प्रमाण मराठी : तुला शिकून खूप मोठ व्हायच ना.

 कोकणी : तुलं शिकून मोठा व्हायचा ना.

 वारली : तुलं शिकून खूप शहाणे व्हायचे आहे ना.

 ढोरकोळी : तुलं शिकून खूप मोठ व्होयाच ना.

५१. प्रमाण मराठी : आपण आता थोड्या गप्पा मारू.

 कोकणी : आता आपले गोठ करू.

  वारली : आपण आता थोड्या गोष्टी करू.

 ढोरकोळी : आपण आता बसून गोठी करू.

५२. प्रमाण मराठी : जरा मन मोकळ करून खरे सांग.

 कोकणी : जराक मन मोकळ करून सांग.

 वारली : जरा मन मोकळा करून खरा सांग.

 ढोरकोळी : जरा मन मोकळा सांगून खरा बोल.

५३. प्रमाण मराठी : चला आपण फिरायला जाऊ

 कोकणी : चल आपले हिंडायले जांव.

  वारली : चल आप हिंडायला जाऊ.

 ढोरकोळी : चला आपण जरा हिंडून येवू.

वनवासी प्राथमिक विद्यार्थी सुसंवाद

१३९