पान:विश्व वनवासींचे.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४०. प्रमाण मराठी : खूप शिकून मोठी होतात.

 कोकणी : बरीच शिकून मोठी होत्यात.

 वारली : खूप शिकून मोठी होतात.

 ढोरकोळी : खूप शिकून मोठी होतात.

४१. प्रमाण मराठी : तू काय काय जेवतो.

 कोकणी : तु काय काय जेवतोस.

 वारली : तू काय काय खातो.

 ढोरकोळी : तू काय काय खातो.

४२. प्रमाण मराठी : आज काय जेवला सांग?

 कोकणी : आज काय जेवलास सांग?

 वारली : आज काय खाल्ल सांग?

 ढोरकोळी : आज काय खाल्ला सांग?

४३. प्रमाण मराठी : तुला बरं वाटत नाही का?

 कोकणी : तुलं बेस नाय का?

 वारली : तुल बर वाटत नाय का?

 ढोरकोळी : तूलं बेस आहे का नाय?

४४. प्रमाण मराठी : काय तुझ दुखते सांग.

 कोकणी : काय तुझ दुखतं सांग.

  वारली : तझ काय दुखत आहे काय, काय?

 ढोरकोळी : काय तुझा दुखतं? सांग.

४५. प्रमाण मराठी : कोणाला तब्येत दाखविली.

 कोकणी : कोणालं तबेत दावली.

  वारली : कोणालं तब्येत दाखविली?

 ढोरकोळी : कोणालं तब्येत दाखिवलीस?

४६. प्रमाण मराठी : औषध घेतल का? कोणी दिल?

 कोकणी : औषध घेतलास काय कोणी दिल्हा?

 वारली : दवा घेतलात का? कोणी?

 ढोरकोळी : औषध घेतल का?

१३८
विश्व वनवासींचे