पान:विश्व वनवासींचे.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३३. प्रमाण मराठी : मग कशाला रडतो, असे रडू नये.

 कोकणी : मग कसेल रडतोस, असा रडायचा नाय.

  वारली : मग कसेला रडतो, असा रडू नाय.

 ढोरकोळी : मग कशा रडतो, असा रडे नये.

३४. प्रमाण मराठी : मला त्याच नाव सांग.

 कोकणी : मालं त्येचा नाव सांग.

 वारली : मालं त्याच नाव सांग.

 ढोरकोळी : मालं तेचा नाव सांग.

३५. प्रमाण मराठी : कोण तुझ्या वाटी गेला.

 कोकणी : कोण तुझे वाटलं गेला.

 वारली: कोण तुझे वाटी गेला.

  ढोरकोळी : कोण तुझे मागा लागलाय.

३६. प्रमाण मराठी : मी त्याला शिक्षा करतो.

 कोकणी : मी त्येलं शिक्षा करतू.

 वारली : मी त्याला मार देईन.

 ढोरकोळी : मी तेला अटक करतो.

३७. प्रमाण मराठी : मी त्याला खूप खूप रागावतो.

 कोकणी : मी त्येलं बराच रागवीन.

  वारली : मी त्याच्यावर खुप खुप रागावेन.

 ढोरकोळी : मी तेचेवर आता रागवीन.

३८. प्रमाण मराठी : वेडे, मूर्ख अभ्यास करीत नसतात.

 कोकणी: वेडी, मुर्ख दोषा अभ्यास करत नाय.

  वारली : वेडा, मुर्ख मुल अभ्यास करीत नाही.

 ढोरकोळी : वेडी, मुर्ख मुला अभ्यास करीत नसतात.

३९. प्रमाण मराठी : शहाणी मूले अभ्यास करतात.

 कोकणी : सेहनी पोषा अभ्यास करलेत.

  वारली : हुषार मुलगा अभ्यास करतो.

 ढोरकोळी : सहाणे मुला अभ्यास करतात.

वनवासी प्राथमिक विद्यार्थी सुसंवाद

१३७