पान:विश्व वनवासींचे.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७. प्रमाण मराठी : मला हा शब्द लिहून दाखव.

 कोकणी : माले सब्ध लिहून दाखव.

  वारली : मला हा शबद लिहून दाखव.

 ढोरकोळी : मालं लिहून दावजोस.

२८. प्रमाण मराठी : मी तुझी वही तपासून देतो, आण.

 कोकणी : मी तुझी वही तपासून देवू, आणं.

 वारली : मी तुझी वही तपासून देईन आणं.

 ढोरकोळी : मी तुझी वही तपासतोच.

२९. प्रमाण मराठी : आता तुझ्या लक्षात चुका आल्या ना.

 कोकणी : आता तुझे लक्षेत चुका आल्या ना.

  वारली : तुला आता समजेल आहे ना का चुकेल आहे ते.

 ढोरकोळी : आता तुले माहिती पडला का.

३०. प्रमाण मराठी : पुन्हा अशा चुका करायच्या नाही, लक्षात ठेव विसरायचे नाही.

  कोकणी : परत आजून चुका करशिल नको, लक्षेत ठेव. वसरशील नको.

  वारली : अजून अशा चुका करायच्या नाही पाय, ध्यानात ठेव विसरू नको.

 ढोरकोळी : अजून अशा चुका करायच्या नाही पाय, ध्यानात ठेव विसरू नको.

३१. प्रमाण मराठी : तू बोलत का नाहीस नेहमी.

 कोकणी : तू बोलत कश्या नाय. सारखा.

  वारली : तू बोलत कस नाहीस. सदा बोलत जाव.

 ढोरकोळी : तू बोलत कसा नाहीस, सदा बोलत जाव.

३२. प्रमाण मराठी : तुला कोणी मारले का?

  कोकणी : तुल कोणी झाडेलाय काय?

 वारली : तुलं कोणी मारला का?

  ढोरकोळी : तुलं कोणी कुटला का?

१३६
विश्व वनवासींचे