पान:विश्व वनवासींचे.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०. प्रमाण मराठी : तुला मी कधीच मारणार नाही.

 कोकणी : तुलं मी कधीच सोडत नाय.

 वारली : तुलं मी कधीच मारणार नाय.

 ढोरकोळी : तुलं मी कध्धीच कुटणार नाय.

२१. प्रमाण मराठी : मी मारणारा मास्तर नाही.

 कोकणी : मी झोडपणारा मास्तर नाय.

 वारली : मी मारणारा मास्तर नाय.

 ढोरकोळी : मी कुटणारा मास्तर नाय.

२२. प्रमाण मराठी : पाटी काढा, पाटीवर लिहा.

 कोकणी : पाट्या काहडा. पाट्यावर लिहा.

  वारली : पाटी काढ पाटीवर लिह.

 ढोरकोळी : पाटी काडपोरा तेवर लिह.

२३. प्रमाण मराठी : पुस्तक काढा, पान नऊ उघडा.

 कोकणी : पुस्तक काहडा, पान नऊ उघड.

 वारली : पुस्तक काढ, पान नऊ उघड.

 ढोरकोळी : पुस्तक काडदोस, पान नऊ काडदोस.

२४. प्रमाण मराठी : गडबड करू नका, शांत बसा.

 कोकणी : गाज नको करा, उगाच बसा.

  वारली : गडबड करू नको, उगाच बस.

 ढोरकोळी : गाज करओ नको, उगाच बस.

२५. प्रमाण मराठी : आता मी तुम्हाला लिहून देणार आहे.

 कोकणी : आता मी तुम्हाला लिहून दीन.

 वारली : आता मी तुम्हाला लिहून देईन.

 ढोरकोळी : आता मी तुम्हाला लिहून दिणार आहे.

२६. प्रमाण मराठी : तू वाच बरं वाचून दाखव.

 कोकणी : तू वाच बर, वाचून दाखव.

  वारली : तू वाच बर वाचून दाखव.

 ढोरकोळी : तू वाजजोत वाचून दाव माला.

वनवासी प्राथमिक विद्यार्थी सुसंवाद

१३५