पान:विश्व वनवासींचे.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३.प्रमाण मराठी : भाऊ काय काम करतात?

 कोकणी : भाऊस काय काम करत?

  वारली : भावस काय काम करतो?

 ढोरकोळी . : भाव काय काम करतो?

१४. प्रमाण मराठी : तुझी शेती किती एकर आहे?

 कोकणी : तुझी शेती कोठीक एकर आहे?

 वारली : तुझी जमीन किती एकर आहे?

 ढोरकोळी : तुझी जागा किती एकर आहे?

१५. प्रमाण मराठी : घरात आणखी कोण शिकलेले आहे?

 कोकणी : घरात आखुन कोण शिकेल आहे?

  वारली : घरात तुझी किती माणसा शिकेल आहेत?

 ढोरकोळी : तुझा घरात आजून कोण शिकेल हाय?

१६. प्रमाण मराठी : कोण कोण किती शिकलेले आहेत.

 कोकणी : कोण कोण किती शिकेल आहे.

  वारली : कोण कोण किती पुस्तक शिकेल आहात.

 ढोरकोळी : कोण कोण किती पुस्तक शिकेल आहात.

१७. प्रमाण मराठी : तुला समजले का?

 कोकणी : तुलं समजला काय?

 वारली: तुला समजत काय

 ढोरकोळी : तुले समजल काय?

१८. प्रमाण मराठी : कोणता विषय तुला आवडतो.

 कोकणी : तुल कणचा विसय आवडतो

 वारली : कोणता विषय तुला आवडतो.

 ढोरकोळी : कणचा विषय तुल जास्त आवडतो.

१९. प्रमाण मराठी : का बर? कारण काय?

 कोकणी : काय जण? काय कारण आहेत.

  वारली : कशा बर? काय कारण.

 ढोरकोळी : कशा बर? काय कारण.


१३४
विश्व वनवासींचे