पान:विश्व वनवासींचे.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६. प्रमाण मराठी : घाबरू नको.

 कोकणी : भिवस नको.

  वारली : भिवू नको.

 ढोरकोळी : घाबरस.

७. प्रमाण मराठी : सावकाश सांग. शांतपणे सांग.

 कोकणी : वज सांग. मुकाटेच सांग.

  वारली : आस्ते सांग. वज सांग.

  ढोरकोळी : आस्ते सांग. हळू सांग.

८. प्रमाण मराठी : तुला आई बाप आहेत ना?

 कोकणी : तुल आस बाहास आहे काय?

 वारली : तुला आय बाप आहेत का?

  ढोरकोळी: तुझे आईस बास आहे का नाय?

 प्रमाण मराठी : भाऊ किती?

  कोकणी : भाऊस किती?

 वारली : भाऊ किती?

  ढोरकोळी : कोठक भाव?

१०. प्रमाण मराठी : बहिणी किती?

 कोकणी : बहण्यास किती?

  वारली: बहिण किती?

 ढोरकोळी : बहिणीस कोहडी?

११. प्रमाण मराठी : बाप काय काम करतो?

 कोकणी : बाहस काय काम करतो?

 वारली : बाप काय काम करतो?

 ढोरकोळी : बास काय काम करतो?

१२. प्रमाण मराठी : आई काय काम करते?

 कोकणी : आईस काय काम करते?

  वारली : आया काय काम करते?

  ढोरकोळी : आईस काय काम करते?

वनवासी प्राथमिक विद्यार्थी सुसंवाद

१३३