पान:विश्व वनवासींचे.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वनवासी विद्यार्थ्यांशी सुसंवाद

 शिक्षक आणि प्राथमिक शाळेतील वनवासी विद्यार्थी यांच्या सुसंवादासाठी वनवासी बोलीतील काही निवडक नित्योपयोगी वाक्ये दिलेली आहेत. ती वनवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी उपयुक्त आहेत. तीन बोली भाषेत ही निवडक ७० वाक्ये आहेत.

१. प्रमाण मराठी : तुझे संपूर्ण नाव सांग.

  कोकणी : तुझा आखा नाव सांग.

  वारली : तुझा सगळा नाव सांग.

  ढोरकोळी : तुझा सगळा नाव काय?

२. प्रमाण मराठी : तुझे गाव कोणते?

 कोकणी: तुला गाव कणचा?

 वारली : तुझा पाडा कोणता?/ कणचा?

  ढोरकोळी : तुझा पाडा कणचा?

३. प्रमाण मराठी : तालुका कोणता?

 कोकणी: तालुका कणचा?

  वारली : तालुका कोणता?

  ढोरकोळी : तालुका कणचा?

४. प्रमाण मराठी : तुझ्या घरात एकूण माणसे किती?

  कोकणी : तुझ्या घरात आखली माणसं?

 वारली : तुझे घरात एकूण माणसं किती?

  ढोरकोळी : तुझ्या घरात कोहडिक माणसां आखात?

५. प्रमाण मराठी : मी बोलतो हे तुला कळले का?

  कोकणी : मी सांगू ते तुले समजतं का?

  वारली : मी सांगतो ते तुला कळला का?

  ढोरकोळी : मी सांगतो ते तुला कळला?


१३२
विश्व वनवासींचे