पान:विश्व वनवासींचे.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमाणात वापरण्याची योजना झाली पाहिजे.

 रेडिओ, टी.व्ही., कॅसेटस् यांचाही वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. व्यक्तिगत लक्ष पुरवून शिक्षकांनी उच्चार, लेखन, आवाज यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वत: शिक्षकांनी फलक लेखन अधिक प्रमाणात केले पाहिजे. नमुना म्हणून का होईना अभ्यासक्रमावर आधारित निबंध, रसग्रहण, संदर्भलेखन केले पाहिजे. न रागवता, आत्मीयतेने वनवासी विद्यार्थ्यांच्या चुका समजावून देणे महत्त्वाचे आहे. निबंधासारखे दिर्घोत्तरी प्रश्न भाषिक कौशल्याच्या वाढीला उपकारक ठरतील म्हणून ते विचारले पाहिजेत.

ड) बोलीकडून प्रमाण मराठी भाषेकडे वनवासी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांचे गृहपाठ नीट तपासणे, चुका समजावून देणे या बारीक गोष्टींवरही लक्ष दिले तर वनवासी विद्यार्थ्यांची भाषिक प्रगती होऊ शकेल.

इ) श्रवण, वाचन, लेखन, कौशल्य-सुधारण्यासाठी प्रयत्न झाल्यास व्यक्तिमत्व विकास आणि वनवासींमधील स्वावलंबन, आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

***

(हा प्रबंधाचा संक्षिप्त सारांश संपादित करून दिला आहे. मूळ प्रबंध ८१ पृष्ठांचा असून त्यात एकूण प्रकरणे ११ आहेत. व चार परिशीष्ट जोडलेली आहेत.)

***


वनवासी विद्यार्थी मराठी सुधार : संकल्प चित्र

१३१