पान:विश्व वनवासींचे.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संदर्भातही अध्यापक, विद्यार्थ्यांच्यामध्ये विशेष जाणीव आढळली नाही याचा अर्थ संभाषण कौशल्य वाढीसाठी विशेष प्रयत्न प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर केले जात नाही असे निदर्शनास येते.

सूचना

 अ) प्रस्तूत ठिकाणी सादर केलेला हा अभ्यास जव्हार तालुका फार तर ठाणे जिल्हयापुरताच मर्यादित असल्याने हाती आलेले निष्कर्ष यांच्यावरही मर्यादा येऊन पडते, तथापि, विद्यार्थ्यांचा दर्जा, कुवत आणि वातावरण, परिसरातील भिन्नता लक्षात घेऊनही थोड्याफार फरकाने हे विवेचन सर्वत्र लागू पडावे व उपयुक्त ठरावे असेच आहे. वनवासी भागात, वनवासी बोलीत आणि प्रमाण मराठीत विद्यार्थी बोलू शकतील असे द्वैभाषिक होण्यासाठी विशेष लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. भाषा वैज्ञानिकांना हे जणु एक नवे आव्हान आहे. याकडे त्यांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे.

ब) वनवासी विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये सर्वार्थाने विकसित होणे गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षण बोली भाषेमधून घ्यायला महाराष्ट्र शासन जागरूक असून अनुकूलही आहे, ही गोष्ट निश्चितच लाभदायक ठरणार आहे. अपेक्षित असलेली भाषिक उद्दिष्टे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना कळण्यासाठी पुस्तकातच छापलेली असावीत. म्हणजे सहज उपलब्ध होतील.

 बोली भाषेच्या वापरातूनच प्रमाण मराठी आत्मसात करायला निश्चितच फार मोठी चालना मिळेल. नागरी जीवन आणि संस्कृती यांच्यापासून दूर राहिल्याने वनवासी विद्यार्थ्यांना घरीदारी सर्वत्र मराठी बोली भाषाच ऐकू येते. पुढे जेव्हा नोकरी व्यवसायानिमित्ताने त्यांना शहरात राहवे लागते त्यावेळी प्रमाण मराठी त्याला वापरता येईल. त्यामुळे वनवासी मुलांचे प्रमाण मराठी सुधारू शकेल व विद्यार्थ्यांचा न्यूनगंड संपून जाईल.

क) पाठ्यपुस्तके, साधन-सामग्री यांची उत्तम अध्ययन, अध्यापन यासाठी पूर्तता झाली पाहिजे. या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन वनवासी विद्यार्थी शक्य तेवढ्या लवकर दृक्श्राव्य माध्यमे विपुल

१३०
विश्व वनवासींचे