पान:विश्व वनवासींचे.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपलब्ध झालेल्या माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यात आले. त्याचा फार मोठा आधार या सादर केलेल्या अभ्यासाला आहे, याशिवाय वनवासींच्या भाषेतील वेगळेपण लक्षात घेण्यासाठी प्रमाण मराठी व वनवासी बोलीतील शब्दांचा संग्रह करण्यात आला. वनवासी बोली व प्रमाण मराठी यातील तफावत लक्षात घेण्यासाठी शब्दांचा संग्रह याचा उपयोग करण्यात आला. एक प्रकारे ही भाषिक व्याप्ती म्हणता येईल.

 अध्यापकांना याच हेतूने प्राथमिक शाळेतील लहान मुलांशी सुसंवाद साधताना नित्य उपयोगी पडतील अशी सुमारे पंच्याहत्तर प्रमाण मराठीतील वाक्ये निवडून वनवासी बोलीत रुपांतर करून घेतले. ग्रामीण वनवासी भागातील शिक्षकांना त्याचा प्रत्यक्षात उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. पण त्याबरोबरच प्रमाण मराठी आणि वनवासी बोलीतील शब्दसंग्रह व वाक्य रचनेचे स्वरूप व भेद लक्षात यावा हा ही हेतू होता.

 वनवासी व प्रमाण मराठी यातील तफावत या वाक्यांनी लक्षात आली. एका प्रमाण मराठीतील वाक्याचे कोकणी, वारली, ढोरकोळी, मल्हार कोळी या भाषेत रूपांतर येथे केले आहे. प्रकल्पाच्या अखेरी परिशिष्टात त्याचा समावेश केला आहे. त्याची उपयुक्तता प्रत्येकाला जाणवल्याशिवाय राहणार नाही.

 या शिवाय वनवासी पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचे मराठी अध्यापन व अध्ययनाच्या संदर्भात प्रदीर्घ भेटीतून, मुलाखतीतून निरीक्षण केले. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून निबंध लिहून घेऊन, पत्रातून वा समक्ष भेटी-गाठीतून माहिती मिळवली.

 इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या मराठी विषयीच्या शासनाने प्रकाशित केलेल्या सुधारित अभ्यासक्रमांचा आधार घेतला. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या बालभारती पुस्तकांचे वनवासी विद्यार्थ्यांच्यादृष्टीने विश्लेषण केले. निरीक्षण केले. प्रत्यक्ष वयोगट व वर्गनिहाय फक्त वनवासी विद्यार्थांची भाषिक कौशल्ये वाढविण्याच्यादृष्टीने पहाणी केली.

निष्कर्ष

 प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सहा ते चवदा ह्या वयोगटातील

वनवासी विद्यार्थी मराठी सुधार : संकल्प चित्र

१२७