पान:विश्व वनवासींचे.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्यार्थ्यांची मराठी भाषा सुधारण्यासाठी अशा संशोधनाची आवश्यकता भासते.

व्याप्ती आणि मर्यादा

 मराठी बालभारती इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचाच विचार या प्रकल्पात केला आहे. साधारणपणे सहा ते चौदा या वयोगटातील विद्यार्थ्यांपुरताच विचार येथे केला आहे. भौगोलिकदृष्ट्या ठाणे जिल्हा आणि त्यातही प्रामुख्याने जव्हार तालुक्यातिल काही मोजक्या निवडक प्राथमिक - माध्यमिक शाळा यातील मराठी विषयाच्या अध्यापनअध्ययन कार्याचा विचार प्रस्तुत ठिकाणी केला आहे.

नमुना निवड

 नमुना म्हणून प्रकल्पासाठी एकूण दहा शाळांची निवड केली आहे. प्रत्यक्षात मात्र अधिक शाळांची पाहणी केली. त्यामध्ये माध्यमिक, प्राथमिक, आश्रमशाळा यांचा समावेश आहे. त्यातही शहरी वातावरणातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, ग्रामीण वातावरणातील माध्यमिक, प्राथमिक आश्रमशाळा यांची निवड केली. प्रामुख्याने प्राथमिक शाळातील विद्यार्थी व शिक्षक, मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ व पालक यांच्याशी चर्चा, मुलाखती, प्रश्नावली यातून संवाद साधला. साधारणपणे शंभर शिक्षक, तीनशे विद्यार्थी, दहा शिक्षणतज्ज्ञ, दहा प्रशासकीय अधिकारी, दहा पालक यांचेशी प्रश्नावली, अनौपचारिक चर्चा, भेटी गाठी, संवाद यातून व्यक्तिगत, सामुदायिक पातळीवर संवाद साधण्यात आला. विद्यार्थी व पालकांमध्ये केवळ वनवासींचाच समावेश होता तर शिक्षकांमध्ये पन्नास टक्के आदिवासी होते.

साधन सामुग्री आणि पद्धती

 यामध्ये विशेष भर अध्यापक प्रश्नावलीवर देण्यात आला. या प्रश्नावलीत इयत्ता पाचवीसाठी दहा प्रश्न होते तर इयत्ता सहावीसाठीही दहा प्रश्न होते तर इयत्ता सातवीसाठी आठ प्रश्न विचारले होते व तीन प्रश्न मराठी विषयाच्या अध्यापकांना मराठीचे परिणामकारक अध्यापन आणि त्यातील अडचणी, त्या दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न या विषयीच्या प्रश्नांचा समावेश होता. अशी ही एकूण एकतीस प्रश्नांची ही प्रश्नावली शंभर अध्यापकांकडून भरून घेण्यात आली. त्या आधारे


१२६
विश्व वनवासींचे