पान:विश्व वनवासींचे.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४) वनवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्ये आत्मसात

   करण्यातील अडचणी पाहणे व त्यावर उपाय सूचविणे.

  ५) वनवासी विद्यार्थ्यांच्या श्रवण, संभाषण, वाचन, लेखन

  या कौशल्यामध्ये वाढ करण्याच्यादृष्टीने सर्वसाधारणपणे

  होणाऱ्या चुका शोधणे व त्यांची कारणमीमांसा करणे

  व त्यावर मात कशी करता येईल यादृष्टीने विचार

  करणे.

 ६) मराठी विषयाची गोडी लावून वनवासी विद्यार्थ्यांची

  मराठी भाषा समृद्ध करण्याचा विचार करणे.

संशोधन प्रकल्पाची आवश्यकता

 वनवासी विद्यार्थ्यांची मायबोली मराठी असूनही प्रमाण मराठी आत्मसात करणे त्यांना अवघड वाटते. मराठी सारखा परिचित विषय असूनही त्यांना कमी गुण मिळतात. यासाठी वनवासी विद्यार्थ्यांची मराठी विषयातील गुणवत्ता वाढविणे गरजेचे वाटते. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे व प्रामुख्याने महाराष्ट्रातच आपल्या जीवनाचा व व्यक्तिमत्वाचा विकास वनवासींना करून घ्यावयाचा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या वनवासींच्या विकासासाठी अशा प्रकारच्या संशोधनाची गरज आहे. वनवासी विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यात उभे राहण्यासाठी भाषिक कौशल्ये वाढविणे अगत्याचे आहे.

 वनवासी विद्यार्थ्यांना निसंकोचपणे मराठी उत्तम त-हेने ऐकता, बोलता, वाचता, लिहिता आले पाहिजे. नेमक्या या भाषिक कौशल्यांचा अभाव वनवासी विद्यार्थ्यांच्या सहवासात वावरताना आज जाणवतो. मुळातच विविध वनवासी बोली बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्टसंमत मराठी, जे सर्वत्र बोलले जाते त्याकडे वळविणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या वनवासींची मातृभाषा मराठी सुधारण्यासाठी प्रयत्न सुचविणाऱ्या संशोधनाची मुळात गरज आहे. प्राथमिक वयोगटातील वनवासींचा मराठी भाषेचा पाया पक्का घातला गेला, की मग पुढे आपोआप माध्यमिक व उच्च शिक्षणात त्यांची मराठी भाषा समृद्ध होईल व जीवनात ते ताठ मानेने वावरू शकतील. म्हणून वनवासी

वनवासी विद्यार्थी मराठी सुधार : संकल्प चित्र

१२५