पान:विश्व वनवासींचे.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवासी विद्यार्थी मराठी
सुधार : संकल्पचित्र
संशोधन प्रकल्प (१९८५-८६)

संशोधन क्षेत्र : वनवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भात मराठी भाषेच्या

कौशल्य वाढीचा विचार.

प्रकल्पाचे शीर्षक : वनवासी विद्यार्थी मराठी सुधार.

अभ्यासकाचे नाव : भास्कर व्यंकटराव गिरधारी

एम्.ए. पीएच.डी. गोखले एज्युकेशन सोसायटीचे, कला आणि वाणिज्य महाविद्यालय,

जव्हार (जि. ठाणे) ४०१६०३.

प्रकल्पाची उद्दिष्टे

 प्रकल्पाचा मुख्य हेतू वनवासी विद्यार्थ्यांची मराठी भाषेची श्रवण, संभाषण, वाचन, लेखन ही कौशल्ये वाढविण्याची आवश्यकता प्रस्थापित करणे आणि वनवासी बोली बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाण मराठी भाषेकडे शक्य तेवढ्या लवकर आकर्षित करणे हा आहे. प्रकल्पाच्या विशिष्ट उद्दिष्टांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 १) इयत्ता पहिली ते सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकाचा

 वनवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणे.

 पाठ्यपुस्तकाचे या दृष्टीने विश्लेषण करून वनवासी

  विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांची पाहणी करणे व त्यावर

 उपाय सुचविणे.

 ३)वनवासी भागातील मराठी विषयाच्या अध्यापकांच्या

  दृष्टीने अध्यापनात आणि अध्ययनात येणाऱ्या अडचणी

 आणि वनवासी विद्यार्थ्यांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद.

विश्व वनवासींचे
१२४