पान:विश्व वनवासींचे.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ९) प्रकल्पाचे निष्कर्ष व उद्दिष्ट यांचा समन्वय साधणे.

 १०) वनवासी महिला शिक्षण विषयाच्या संदर्भात महत्त्वाच्या शिफारशी करणे.

९) कार्यपद्धती

 अ) निवड : निवडक पाच शैक्षणिक संस्था पाहणीसाठी घेऊन त्यातील फक्त वनवासी महिलांना वा विद्यार्थिनींना प्रश्नावली दिली जाईल. त्यातून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीचा शोध घेता येईल.

 आ) साधने : प्रश्नावली, मतावली, मुलाखत, चर्चा, निरीक्षण, चाचणी या साधनातून उद्दिष्टांशी समन्वय साधून माहिती उपलब्ध करून घेण्यात येईल. शक्यतो अनौपचारिक पद्धतीने माहिती मिळवून हा प्रकल्प सिद्ध होऊ शकेल.

 इ) माहितीचे संकलन व पृथक्करण : उपरोक्त साधनातून हाती आलेली माहिती क्रमश: मुद्देसूदपणे संकलीत करण्यात येईल व त्यातून वनवासी महिला शिक्षणाचा अंदाज घेता येईल.

 उपलब्ध माहितीच्या संकलनाबरोबरच उद्दिष्टानुरूप क्रमवार अनुमाने काढता येतील.

१०) निष्कर्ष

 अनुमानावरून हाती आलेले निष्कर्ष सादर केले जातील.

११) शिफारशी

 प्रकल्पाचे सार शिफारशीत आलेले असेल, उद्दिष्टांची व अनुमानांची या शिफारशींशी सुसंगती राहील. प्रकल्पातील शिफारशी वनवासी ग्रामीण महिला शिक्षणाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील हीच या प्रकल्पाची जमेची बाजू असेल.

 वनवासी महिला शिक्षण अभ्यासाची दिशा या निमित्ताने स्पष्ट व्हावी एवढाच प्रस्तुत लेखाचा हेतू आहे.

***

वनवासी महिला शिक्षण संशोधन : संकल्प चित्र

१२३