पान:विश्व वनवासींचे.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमाण अत्यल्प आहे. त्यातही पुन्हा वनवासी ग्रामीण क्षेत्रातील महिलांच्या विकासासाठी त्यांच्या शिक्षणाचा अग्रक्रमाने विचार होणे अगत्याचे आहे. प्रस्तुत प्रकल्पातून जर या वनवासी महिलांच्या शिक्षणाची पाहणी करून त्यातील अडीअडचणी व समस्या यावर प्रकाशझोत टाकता आला; त्याचबरोबर काही मूलभूत उपाययोजना सुचविता आल्या तर महिला शिक्षणाच्या दृष्टीने एकूण समाज सुधारणेच्या दृष्टीने आणि देशहिताच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहे. नमुना म्हणून जरी जव्हार तालुक्यापुरती माहिती असली तरी कमी अधिक प्रमाणात धुळे जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा अहमदनगर जिल्हा यातील वनवासी तालुक्यांची अशीच महिलांच्या शिक्षणाची स्थिती असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प ठिकठिकाणच्या वनवासी क्षेत्रातील महिलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी महत्त्वाचा ठरू शकेल. महिला शिक्षणातून समाजविकास व समाजविकासातून महिला शिक्षण यांना वाव देता येतो. या दोन्हीही प्रक्रियांचे महत्त्व या निमित्ताने लक्षात आणून देता येईल.

८) उद्दिष्टे

 १) वनवासी भागातील माध्यमिक, उच्चमाध्यमिक महाविद्यालयातील महिलांच्या शिक्षण स्थितीचा अभ्यास करणे.

 २) वनवासी महिलेच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा (सुशिक्षित, अशिक्षित) अभ्यास

 ३) वनवासी भागातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा परामर्श घेणे.

 ४) वनवासी महिला समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, गैरसमजूती यांचा विचार करणे.

 ५) वनवासी महिलामधील चालीरीती, सणवार, धार्मिक जीवन यांचा आढावा घेणे.

 ६) वनवासी भागातील महिलांचा शिक्षण दर्जा समजावून घेणे.

 ७) महिला शिक्षणातील अडसरांची क्रमशः नोंद घेणे.

 ८) महिला शिक्षणांवरील अडसरांवर क्रमश: उपाययोजना सुचविणे.

१२२
विश्व वनवासींचे