पान:विश्व वनवासींचे.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत, त्या कशा रीतीने दूर करता येतील, प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून जाणीवपूर्वक याची नोंद घेतली गेलेली फारशी आढळत नाही. म्हणून या प्रकल्पात लोकसंख्या शिक्षणात असलेले महिला शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यातही पुन्हा अतिग्रामीण वनवासी महिलांच्या शिक्षणाची आजवर झालेली व होत असलेली हेळसांड, प्रत्यक्ष पाहून वनवासी महिला शिक्षणाकडे विशेष लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे हे मांडावयाचे आहे. ही मांडणी आजच्या नव्या काळाची महत्त्वाची गरज आहे.

४) या क्षेत्रात पूर्वी झालेली संशोधने

 लोकसंख्या शिक्षणाच्या तात्त्विक भूमिकेतून नव्या दृष्टिकोनातून ग्रामीण वनवासी महिलांच्या शैक्षणिक परिस्थितीवर स्वतंत्र संशोधन झालेले फारसे आढळत नाही. त्यामुळे हा प्रकल्प लोकसंख्या शिक्षणाच्या नव्या दृष्टिकोनातून वनवासी महिला शिक्षणाचा विचार नव्याने मांडू शकेल असे वाटते.

५) व्याप्ती

 या प्रकल्पात फक्त जव्हार तालुक्यातील बहुसंख्य (९०%) वनवासी असलेल्या खेड्यापाड्यातील माध्यमिक, उच्चमाध्यमिक महाविद्यालयातून शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षावरील वयोगटातून वनवासी मुलींच्या शैक्षणिक स्थितीची पहाणी करायची आहे. त्याचप्रमाणे विविध संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या अनौपचारिक शैक्षणिक कार्याचा विचार करता येईल. या महिलांचे मार्गदर्शक, पालक, शिक्षक काही शिक्षणतज्ज्ञ व लोकप्रतिनिधी त्यांच्या मुलाखती, चर्चा, प्रश्नावलीला मिळणारा प्रतिसाद एवढाच विचार या छोट्याशा प्रकल्पात करता येईल.

६) मर्यादा

 फक्त जव्हार तालुका एवढ्यापुरताच हा अभ्यास मर्यादित आहे. प्राथमिक शाळांचा विचार यात केला जाणार नाही.

७) प्रकल्पाचे महत्त्व

 उपलब्ध जनगणना सांख्यिकी माहितीवरून महिला शिक्षणाचे

वनवासी महिला शिक्षण संशोधन : संकल्प चित्र

१२१