पान:विश्व वनवासींचे.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. त्यामुळे स्वाभाविकच अत्यंत आस्थापूर्वक, आत्मीयतेने सतत दोन वर्षे या विषयाला वाहून घेऊन राघोजी भांगरे या क्रांतिकारकाला पुस्तक रूपाने अभिवादन केले आहे. जनमानसात आणि समाजातही राघोजींच्या या कार्याबद्दल आदरभाव रुजावा अशा एका कृतज्ञता बुद्धीने त्यांनी हे काम पूर्ण केले आहे.

 १८५७ च्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य समरात वनवासी बांधवांचाही फार मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने खानदेश, नगर, नाशिक, दक्षिण महाराष्ट्र इत्यादी भागांमध्ये कोळी, भिल्ल, रामोशी इत्यादींचे लढे विशेष गाजले. त्यांची तपशीलवारपणे ऐतिहासिकदृष्ट्या दखल घेणे गरजेचे आहे. 'चणकापूर'चे हुतात्मास्मारक याची साक्ष आहे.

 वीर भागोजी नाईक, महिपत नाईक, यशवंत नाईक, म्हारडिया ह्या हुतात्म्यांच्या बरोबरच अनेकांना काळ्या पाण्याची शिक्षा आणि जन्मठेपेच्या शिक्षाही भोगाव्या लागल्या. कित्येकांना कैदी म्हणून इंग्रजांच्या जुलमी राजवटीत यातना सोसाव्या लागल्या. त्यांचे अतोनात छळ झाले हा सगळा इतिहास शोधण्याची आवश्यकता श्री. भाऊसाहेब नेहरे यांच्या पुस्तकाने दाखवून दिली आहे. हौतात्म्याबरोबर आणि जन्मठेपेच्या शिक्षांनी लढे थांबत नसतात. लढाऊ वृत्तीच्या वारसदारांनी ते इंग्रजांविरुद्धचे लढे पुढे चालूच ठेवले त्याचीही नोंद अभ्यासपूर्वक संशोधनातून होणे आवश्यक आहे, हे या पुस्तकाने इतिहासाच्या अभ्यासकांच्या लक्षात आणून दिले आहे. भारतात आपले एकछत्री राज्य स्थापन करावे असे इंग्रजांनी ठरविले पण स्वातंत्र्यप्रिय, स्वच्छंद, मुक्त जीवन जगणाऱ्या झंझार लढाऊ वृत्तीच्या वनवासी भिल्ल, रामोशी, महादेव कोळी यांना ते रुचणारे नव्हते. त्यांनी एकत्रित येऊन गटागटाने संघर्षाला तोंड फोडले. त्यांच्यातला कणखर, करारीपणा इंग्रजांनाही प्रत्ययाला आला. नगर जिल्ह्यातील अकोल्याच्या रामा किरवा याला १८३०मध्ये फाशी दिली. इंग्रज भ्रामक समजुतीत होते, की आता महादेव कोळी डोके वर काढणार नाहीत, त्यांना जरब बसेल. पण ही त्यांची चूक ठरली. त्या रामा किरवालाचा सोबती राघोजी भांगरे पेटून उठला. त्याने पोलीस अधिकारीपणाची बढती

क्रांतिवीर राघोजी भांगरे : प्रस्तावना

११५