पान:विश्व वनवासींचे.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. त्यातूनच स्वतंत्रपणे 'वनयात्री प्रकाशन' हे वनवासी साहित्य प्रकाशनार्थ स्थापन करण्यात आले आहे. वनवासींचे व्यासपीठ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. लिहू पाहणाऱ्या, अनुभवसंपन्न वनवासी बांधवांच्या लालित्यपूर्ण अविष्काराला मूर्तस्वरूप प्राप्त करून देण्यासाठी 'वनयात्री प्रकाशन कार्यरत राहील. 'जांभूळपाडा' कादंबरीची दुसरी नवी आवृत्ती प्रकाशित करण्याचे वनयात्री प्रकाशनाचे नेमके हेच प्रयोजन आहे. सर्वच वनवासाविषयक साहित्याला प्रकाश दाखविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.

समर्थ भारत होण्यासाठी

 साने गुरुजी आणि माजी राष्टपती ए.पी.ज. अब्दुल कलाम यांच्या अपेक्षेप्रमाणे जर खरोखरच आपला भारत देश बलसागर आणि समर्थ व्हावयाचा असेल तर समाजातील सर्वच घटकाचा, अलक्षित, उपेक्षित खेड्यापाड्यांचा विकास झाला पाहिज. वर्ग , वर्ण, जातिविरहित समग्र उन्नती साधली पाहिजे. अशाच दुर्गम आणि ग्रामीण 'जाभूळपाडा'सारख्या गावी एका कार्यकर्त्याने आपले जीवन झोकून दिले. अनेक बांके कठीण प्रसंग झेलले त्यावरच ही कादंबरी बेतलेली आहे.

थंडावलेला सर्वांगीण विकास

 दहशतवादाच्या मुळाशी बऱ्याचदा नक्षलवाद आणि नक्षलवादाच्या मुळाशी थंडावलेला सर्वांगीण विकास हेच कारण आढळले. याचाच अर्थ आपला देश स्वतंत्र होऊन सहा दशके उलटून गेली तरी समग्र विकासाकडे आपण अद्याप जाऊ शकलो नाही. दहशतवाद हटविण्यासाठी ग्रामीण, दुर्गम अशा 'जांभूळपाडा'सारख्या भागाचा विकास आवश्यक आहे. 'जांभूळपाडा' या कादंबरीचे लेखक रमेश पटवर्धन यांना खेड्यापाड्यातील वनवासी लोकांचे कष्टमय जीवन समाजमनस्वी कार्यकर्ता म्हणून अनुभवता आले. या शहरी वातावरणातील लेखकाच्या मनाला संवेदनशीलतेमुळे वनवासी क्षेत्रातील समस्यांनी भंडावून सोडले. ते भारावले. तेथील विरोधकांच्या कारवायाही त्यांच्या लक्षात आल्या. 'जांभूळपाडा' आणि त्यानंतर 'घरवापसी' या कादंबऱ्यांचे

जांभूळपाडा : प्रस्तावना

१११