पान:विश्व वनवासींचे.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा 'भगत' असेही म्हटलेले आहे. मृतांच्या शांतीसाठी हा ‘काज' आहे. त्यात रक्तपाताशी संबंध असल्यामुळे कायद्याने त्याला बंधन घालण्याचेही प्रयत्न झालेले आहेत. 'काज' हे एक अघोरी कृत्य आहे, असे येथे सुचविलेले आहे. 'काज' प्रथेत दारूला महत्त्व आहे, असे लेखक म्हणतो. अर्थात्, त्यातील रक्तपाताचा व अतिरंजित भाग वजा केला, तर ही प्रथा समर्थनीय होऊ शकेल. देवूचा एवढ्यासाठी 'काज'ला विरोध आहे.

 काही मान्यवर मंडळी हे 'काज' पाहण्यासाठी उपस्थित असतात. देवूला ‘काज' प्रथेतील दारूण अर्धसत्य समजल्यावर त्याने त्याविरुद्ध बंड पुकारले. सोनू, देवू या दोन भावांत अंतर आहे. या प्रथेत स्वत:ची कामवासना पूर्ण करून घेण्याची सवय सोनूला जडलेली आहे, असे जे लेखकाने नोंदविले आहे, ते प्रत्यक्षात आढळत नाही आणि कदाचित् असे काही अपवादात्मक वातावरण लेखकाच्या निदर्शनास आलेले असावे; पण त्यात फारसे तथ्य नाही, असे दिसते.

 एकूण या कादंबरीत वर्णन केलेल्या ‘काज' विधीसंदर्भात आगळी स्थिती असली, तरी 'रिंगण' या कादंबरीने 'वनवासी काज' या महत्त्वाच्या प्रथेकडे समाजाचे लक्ष वधले आहे आणि म्हणून ही कादंबरी एक वेगळे दर्शन घडविणारी आहे. जर 'काज'च्या नावाखाली कामपूर्तीची अनिष्ट प्रथा अस्तित्वात असेल, तर या अंधश्रद्धेच्या रिंगणातून बाहेर पडलेले चांगले. या कादंबरीचे स्वागत मराठी वाचक करतीलच. माझ्या शुभेच्छा !

***


रिंगण : प्रस्तावना

१०९