पान:विश्व वनवासींचे.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असेल आणि तरीही तिचे मन अन्य प्रियकराशी जुळले असेल, तर तो वनवासी प्रियकर तिचा त्याही स्थितीत स्वीकार करतो आणि त्या पूर्वीच्या पतीपासून होणाऱ्या मुलाला सांभाळतो. हे होणारे अपत्य 'ओढ्या'!! बाईबरोबर ओढत आलेले; म्हणून ओळखले जाते.यापेक्षा कोणताही मोठा स्त्रीत्वाचा आदर असू शकत नाही; याचा नैतिकतेच्या संदर्भात विचार 'आदर्श' म्हणूनच केला गेला पाहिजे.

 या सगळ्या उदहरणांच्यामधून आदिवासींचा स्त्रीकडे पाहण्याचा उदार आणि उदात्त दृष्टिकोण जो शहरी संस्कृतीत दुर्मिळ झालेला आहे. तो स्पष्टपणे लक्षात येतो. ही नैतिकता अनेक बाबतीत इतरत्रही आढळते.

 अवर्षणाने किंवा अतिवृष्टीने (ओला दुष्काळ) एखादे गाव जर दुष्काळग्रस्त झाले, आपल्या घरातील धान्य संपल्यावर बिनदिक्कतपणे ते कुटुंब, ज्याच्याकडे धान्य आहे, त्याच्याकडे राहायला जाते, ते नातेवाईक वा परिचित असतील, तेही परिस्थिती जाणून एकमेकांना आधार देतात. पण दोन्ही कुटुंबाचे धान्य संपले तर दोन्हीही कुटुंबे मिळून तिसऱ्या धनधान्य संपन्नाकडे जातात. हा परस्पर सद्भाव नैतिकतेचा द्योतक आहे.

 नैतिकतेचा एक आगळा आदर्श म्हणजे गावचे, पाड्याचे एखादे महत्त्वाचे काम होत असेल, उत्सव असेल, मंदिर, शाळा, आरोग्यकेंद्राचे बांधकाम असेल, पण द्यायला तर देणगीसाठी धान्य, पैसा नाही, अशा स्थितीत तो गरीब वनवासी सधनाच्या शेतात ठराविक दिवस मोलमजुरी पत्करतो आणि त्याचा मोबदला तो त्याचा निधी म्हणून देतो. असा कष्टाने वनवासी स्वाभिमान जपतो.

 वनवासींनाही आपले देवधर्म आहेत. दैवते आहेत. वेताळ, झोटिंग, मावल्या, वाघोबा, हिरवा देव, म्हसोबा, कान्होबा, कणसरी (नागली) या ग्रामदैवतांना त्याने आपल्या देव्हाऱ्यात स्थान दिलेले आहे.

 वनवासी भागातून, देवाची पालखी चालली तरी दर्शनाला झोपडीबाहेर वनवासी येत नाही, तेव्हा प्रश्न पडला, असे का? प्रसाद घेऊन त्यांच्या झोपडीत गेलो. 'निदान प्रसाद तरी घ्या, खा.' म्हटले, तेव्हा दर्शनाला न येण्याचे कारण उलगडले. देवाला दिव्यात वाहायला

वनवासी : नैतिक, सौंदर्य शास्त्रीय आणि सामाजिक परिमाणे