पान:विश्व वनवासींचे.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. श्री. रविंद्र सवदीकर आता दिब्रुगडला आहेत. श्री. सवदीकर हे १ल्या इयत्तेत असलेला मुलगा १० वीची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत येथेच राहण्याच्या अटीवर येथे आले होते. माजोली बेटावरच 'मिसिंग' नावाची अत्यंत गरीब अशी जमात आहे. त्यांची घरे बांबूची असतात. पूर आला तरी घरात पाणी शिरू नये म्हणून ती उंचावर बांधलेली असतात. नंतर जोरहाटमार्गे नागालँडला गेलो. सगळे लष्कराचे जवान हातात एके ४७ घेऊन नागालँड व मणिपूर येथे दिसले. कोहिमा येथे प्रवेश पत्रे घेतली. लष्कराचे जवान, पोलीस व वनविभागाच्या तपासणीतून आम्हाला जावे लागले. दिमापूर येथे दुर्गामाता मंदिर पाहिले. नागा जमातीमध्ये १७ जनजाती आहेत. राणी गायडीनल्यू यांनी शिलाँगच्या तुरुंगात स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे जे आयुष्य कंठले त्याची कहाणी कळली. त्या सन १९३२ ते १९४७ पर्यंत तुरुंगामध्ये होत्या. वयाच्या १७व्या वर्षी इंग्रज सरकारने त्यांना तुरुंगात डांबल्यानंतर तब्बल १७ वर्षे त्या तुरुंगातच होत्या. 'वर्ल्ड वॉर सिमेटरी' त्यांच्या त्याग व हौतात्म्य याची साक्ष देत होते. मोईरंगचे नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारक संग्रहालय पाहण्यास मिळणे हे आमचे मोठे भाग्यच होते.

 लोहटक रिसॉर्ट व गार्डन पाहिले. नेताजींचे हस्ताक्षर, पत्रे व मूळ छायाचित्रे पाहिली. नंतर काकचिंग मुलांचे वसतिगृह पाहिले. येथे २३ छात्र आहेत. येथे १२ पूर्णवेळ कार्यकर्ते काम करीत आहेत.

 पूर्वांचलची ही वनयात्रा जवळ जवळ ३००० कि.मी. ची होती. सर्व प्रकारच्या वाहनातून, खडतर अशी आव्हाने पेलत वनयात्रींचा हा प्रवास सुखरुपपणे पार पडला. या वनयात्रेत चीन, म्यानमार व भूतान या देशांच्या सीमा, पाच राज्ये व पाच राजधान्या बघता आल्या. होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, शिवजयंती व नाथषष्टी इत्यादी सण या वनयात्रेच्या कालावधीत आले. राजकारणापासून १३ दिवस अलिप्त राहिलो. तहान भूक विसरून आनंद घेतला. राजकारणातले रूसवे-फुगवे मात्र आमच्यात नव्हते, याचा आम्हांला कायम आनंद वाटत राहील. मा. श्री. संजयराव कुलकर्णी व श्री. अतुलजी जोग यांची बौद्धिके, कार्यकर्त्यांची मनोगते थरारक व अंतर्मुख करणारी अशी होती.

***
१०२
विश्व वनवासींचे