पान:विश्व वनवासींचे.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अपूर्व पूर्वांचल वनयात्रा

 दि.१० ते २२ मार्च, २०१४ (१३ दिवस) ह्या कालावधीच्या वनयात्रेत एकूण ३७ वनयात्री व वनवासी क्षेत्रातील २-३ कार्यकर्ते सहभागी झाले होते. आम्ही दि.१० मार्चच्या रात्री १०.०० च्या सुमारास पुण्याहून बसने निघालो व मुंबईला पहाटे ४.०० वाजता पोहोचलो. तेथून सकाळी ७.२५ च्या सुमारास मुंबई-बागडोग्रा या विमानाने प्रवास करून १२.१० ला बागडोग्रा येथे पोहोचलो. तेथे भोजन करून सिलीगुडीला गेलो व गंगटोक येथे मुक्काम केला.

 दुसऱ्या दिवशी गंगटोकहून बाबाजी हारभजन यांची समाधी आणि चीनच्या सीमेजवळ नाथुला पास पाहिला. येथील हवामान अतिशय उत्तम होते. विमानतळावर एक चहा रू. १२५.०० असल्याने चहाची तल्लफ मारावी लागली. पुरेशी तयारी केलेली असल्याने सामानाची तपासणी व निरनिराळ्या परवानग्या घेण्यात अडचण आल्या नाहीत. गारांचा पाऊस व कडा यांच्या थंडीचा अनुभव सिक्कीम येथे घेता आला. आजूबाजूचे सृष्टी सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असे होते. रस्त्यात सर्वत्र रंगीबेरंगी फुलांचे ताटवे दृष्टीस पडले. 'चांगुलेक'मध्ये अर्धे पाणी व अर्धा बर्फ आहे. या परिसरातील माणसे स्वाभिमानी वाटली. आम्ही ज्या ज्या वाहनातून प्रवास केला ते वाहनचालक कुशल व कष्टाळू होते. या भागातील सीमांवर महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, क-हाड व अकोले येथील जवान तैनात आहेत. त्यांना व आम्हाला एकमेकांना भेटण्याचा आनंद झाला. बाबाजी हरभजनदासची कहाणी अतिशय अद्भूत व रम्य अशी वाटली. सुमारे १७,४०० फूट उंचीवरील हे स्थान आहे. बाबाजी अजूनही जिवंत आहेत असा समज येथे आहे. महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी जवळ जवळ दोन तास वनयात्रींशी गप्पा मारल्या. आमचा सर्वांचा ‘खादा' हे मानाचे वस्त्र देऊन त्यांनी सत्कार केला. त्यांच्या आदरातिथ्याने सर्व वनयात्री भारावून गेलो होतो. त्यांचे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहील. क-हाडच्या श्री. ताम्हणकरांनी ही एका क-हाडच्या सुपुत्राची भेट घडवून आणली. सि कीम येथील रानीपूल भागात आपले सिद्धार्थ हे मुलींचे वसतिगृह आहे. हे वसतिगृह अतिशय उत्कृष्ट, पण उंच अशा टेकडीवर आहे. कोलकत्ता येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या

१००
विश्व वनवासींचे