पान:विवेकानंद.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

आणि यासाठी त्या दृष्टीने अधिक शोध लागावयाचा शिल्लक आहे असेंही नाहीं. हें एकरूप सिद्ध करणें याचेंच नांव ज्ञान. आपणा सर्वोस स्त्री आणि पुरुष या भेददृष्टीनें मी पाहत आहे, इतकेच नव्हे तर प्रत्येक व्यक्ति ही निरनिराळी आहे अशा दृष्टीने पाहत आहे; ही माझ्या दृष्टींतील अनेकता आहे. आतां तुम्हा सर्वांस एकाच कोटींत घालून मनुष्यप्राणी असें नांव मी तुम्हांस दिलें तर ती शास्त्रीयदृष्टि झाली. येथें पहिली पूर्ण भेदाची दृष्टि होती, ती मावळून त्या जागीं एका प्रकारची एकात्मक दृष्टि उत्पन्न झाली. रसायनशास्त्राची दिशा पाहिली तरी ती अशीच आहे. दृष्टीनें दिसणाऱ्या प्रत्येक संकीर्ण पदार्थाचे घटक प्रथम शोधून काढून, नंतर शक्य असेल तर त्या घटकांचें एकच मूल द्रव्य शोधून काढण्याकरितां, रसायनशास्त्री खटपट करतात. ज्या एका मूल- द्रव्यांतून ही सारी जडसृष्टि निर्माण झाली आहे तें मूलद्रव्य त्यांस सांपड- ण्याची वेळही कदाचित् येईल. अशी वेळ आली म्हणजे रसायनशास्त्र पूर्ण झालें असें म्हणावयास हरकत नाहीं. हाच न्याय धर्मशास्त्रालाही पूर्णपणे लागू पडतो. सर्व सृष्टि एकाच मूलरूपांतून व्यक्त झाली आहे असे आपणांस सिद्ध करतां आलें म्हणजे धर्मशास्त्र पूर्ण झाले असें होईल. त्यानंतर धर्म- शास्त्राची वाढ होण्यास मार्गच नाहीं हे उघड आहे.
 आतां यावर एक प्रश्न असा उपस्थित होतो कीं, या दृश्य विविधतेत एका- त्मता-एकरूप-सांपडणें शक्य आहे काय ? आमच्या आर्यावर्तात अशा प्रका- रचा यत्न अत्यंत प्राचीन कालापासून चालू होता. तत्त्वज्ञान आणि धर्माचें शास्त्रीय स्वरूप यांचें उद्घाटन करण्याचा यत्न हिंदुस्थानांत अत्यंत प्राचीन काळापासून चालू होता. धर्म आणि तत्त्वज्ञान या बाबी परस्परभिन्न आहेत असा तुम्हां पाश्चात्यांचा समज आहे. पाश्चात्य देशांत धर्म हा केवळ मताचा प्रश्न समजला जातो; पण हिंदु लोकांनी असा भेद आरंभापासून कर्धी केलेला नाहीं. तत्त्वज्ञान, शास्त्र आणि अनुभव यांच्या पायावरच त्यांनी आपली धर्म- मतें रचिलीं आहेत. आमच्या मतें धर्म आणि तत्त्वज्ञान यांची जोडी फुटणे शक्यच नाहीं. हीं दोन एकाच सनातनधर्माचीं अंगे असून त्यांच्या योग्य मिश्रणानेंच पूर्णधर्म निर्माण होतो. विवेचकबुद्धि आणि सशास्त्र रीतीनें सत्य म्हणून ठरलेल्या गोष्टी यांजपासून तत्त्वज्ञान विसंगत असतां कामा नये; आणि तसेंच या तिहींच्या योग्य मिलाफानेंच धर्माचीं तत्त्वें पक्कीं केली पाहि-