पान:विवेकानंद.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

नसेल त्याचें जीवित भयाण आणि रुक्ष होईल. आपल्यासमोर दिसते आहे तेवढ्यांतच शक्य तितकी चैन भोगून तृप्त रहा, असा उपदेश करणें हें काम फार सोपें आहे. घोडे, गाढवें, कुत्रीं आणि इतर जनावरें हेंच करीत अस तात. दृश्याच्या पलीकडच्या भानगडींत ती कधींही पडत नाहीत; खावें, प्यावें आणि संतुष्ट असावें इतकेंच तींही जाणतात; पण यामुळेच त्यांना आपण जनावरें ह्मणतों हेंही लक्ष्यांत बाळगणे अवश्य आहे. आपणही जर त्यांच्याच नमुन्यानें वागूं लागलों, तर मानवकुलाची पीछेहाट होऊन तें आपल्या पूर्व पशुवृत्तीस जाईल हे उघड आहे. 'धर्मेण हीनाः पशुभिः समानाः' असें एक सुभाषित प्रसिद्ध आहे. मनुष्य आणि पशु यांतील खरा फरक म्हटला तर इतकाच दृश्याच्या पलीकडे पशु कधींही जात नाहीं. यासाठींच मनुष्याची दृष्टि साहजिकपणे वरच्या दिशेकडे असते आणि पशुची अधोमुखी असते.. मनुष्यानें सदोदित ऊर्ध्वगतिक असावें म्हणूनच त्याची दृष्टि ऊर्ध्वगतिक आहे. मनुष्यानें पूर्णत्व पावावें, गरजेच्या पलीकडे जावें, स्वतंत्र व्हावें, मुक्त व्हावें, हाच त्याच्या जीवितक्रमाचा हेतु आहे. यालाच सामान्य भाषेंत पर- मेश्वराची भेट घेणें अर्से आपण म्हणतों. आपल्या जन्माचा हेतु काय आहे हैं जितक्या लवकर आपल्या लक्ष्यांत येईल तितकें वरें नाहीं काय ? हें ज्या- वेळी आपल्या लक्ष्यांत येईल, त्याचवेळी आपण आपला जन्म सफळ होण्याच्या मार्गाला लागलों असें म्हणतां येईल. मुक्तिपथ शक्य तितक्या त्वरेनें आक्र- मण करूं लागणे हेच आपणांस श्रेयस्कर आणि आपल्या मनुष्यत्वास भूषणा- रुपद आहे. आपली खरी किंमत यावरच अवलंबून आहे. तुमच्या खिशांत कितीही पैसा खुळखुळत असला, तुम्ही कितीही भपकेबाज पोषाक केला, अथवा एखाद्या टोलेजंग राजवाड्यांत राहिलां, तरी तुम्हांला कवडीचीही खरी किंमत नाहीं. अध्यात्मविद्येच्या राज्यांत तुमचें जें कांहीं वजन होईल तीच तुमची खरी किंमत ! 'सुन्ना पेरो रुप्पा पेरो पेरो पितलकी तार | रुपिया गजका रेसम पेरो नहीं जीवनकी आस ॥' हें साधुवचन नित्य लक्ष्यांत बाळगून तद- नुरूप वर्तन ठेवणें, हेंच आपल्या मनुष्यत्वास योग्य आहे; हेच आपल्या सर्व- प्रकारच्या उन्नतीचें मूळ आहे. आपली जडविषयक उन्नति असो अथवा वौद्धिक उन्नति असो; तिच्या वाढीला आध्यात्मिक बळाची आवश्यकता आहे. पुढे सरसावण्यास जो उत्साह लागतो, तो सुद्धां आध्यात्मिक वळाच्या साहाय्या-