पान:विवेकानंद.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

फार झालें तर कांहीं थोडा परोपकार करावा."अशा प्रकारच्या विचारमालि- केचे ध्वनी आणि प्रतिध्वनी सर्वत्र उमटत आहेत.फार झालें तर थोडाफार परोपकार करा; यांतच सर्व धर्म आला, असे सांगणारे लोक जिकडे तिकडे आहेत. त्यांच्या सांगण्याच्या तन्हा वेगवेगळ्या असतील, पण सर्वांचा मथि- तार्थ पाहिला तर हाच. एखाद्या मोठ्या पंडितापासून तो 'दादा बाबा' करूं लागलेल्या पोरापर्यंत सर्वांचे विचार याच किंमतीचे आहेत. “चैन करा, परो- पकार करा, यापलीकडचा विचार करून डोकें फिरविण्यांत हांशील नाहीं." हेच धर्मज्ञान सध्या सर्वत्र पसंत पडत चालले आहे. हे मत सध्या इतक्या उच्च घोषानें ऐकूं येतें कीं बाकीचे ध्वनी त्यापुढे रद्द झाले आहेत; यामुळे हेंच मत खरें असले पाहिजे असा भ्रम पुष्कळांस पडतो; पण आनंदाची गोष्ट इतकीच कीं या पलीकडचा विचार करणे आम्हांस भागच पडतें. तोंडानें नाहीं नाहीं म्हणत असतांही अंतःकरण पलीकडच्या प्रदेशांत अनिवार्यपणें ओढ घेत असतें. तुम्ही आपल्या मनाची कितीही समजूत घातली तरी हा विचार तें सोडून देतच नाहीं. इंद्रियजन्यसुखांचा उपभोग कितीही मोठया प्रमाणावर आणि कितीही काल घेतला तरी इंद्रियांची तृष्णा कधींही शांत होत नाहीं; आणि “ मला कशाची तरी गरज आहे, ही जाणीवही नष्ट होत नाहीं. यामुळे समजून अथवा न समजतांही आपणांपैकी प्रत्येक जण गरजेच्या पलीकडे जाण्याचा- मुक्त होण्याचा–यत्न करीत असतो. गरजेच्या पलीकडे जाईपर्यंत मनुष्याच्या यत्नांस खळ पडत नाहीं.
 दृश्य अथवा व्यक्त झालेले विश्व, हें अव्यक्त अस्तित्वाचा एक भाग आहे. एकंदर अस्तित्वापैकी फारच थोडा प्रदेश आपल्या इंद्रियांच्याद्वारा आपल्या आटोक्यांत येतो आणि आपण त्यास दृश्य विश्व असें नांव देतों. बाकीचा मोठा भाग–किंबहुना अनंत भाग- आपल्या इंद्रियांच्या जाणिवेच्या पलीकडे आहे. विश्वाचें कोडें सोडवावयाचे म्हटले तर एकंदर अस्तित्व अवलोकनांत आणल्यावांचून या लहानशा भागाच्या कोड्याचा उलगडा करणे शक्य नाहीं. दृश्य विश्वाच्या पलीकडच्या स्थितींत प्रवेश केल्यावांचून दृश्य विश्वाचें कोडें सोडविणे अशक्य आहे. सॉक्रेटिसाबद्दल एक दंतकथा प्रसिद्ध आहे. एके वेळीं ग्रीस देशांत प्रवास करणारा एक ब्राह्मण त्याला भेटला. त्यावेळी सॉक्रेटीस त्याला म्हणाला, “मनुष्याला स्वतःस अत्यंत कल्याणप्रद असा अभ्यासाचा विषय