पान:विवेकानंद.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन.

८१

रीतीनें सिद्ध करतात हे तुम्हांला सांगण्याचा माझा उद्देश आहे. धर्मविचार मनुष्यमात्राच्या ठिकाणीं अवश्य असतोच असे मला वाटतें. तो त्याच्या प्रकृतीशींच इतका एकरूप होऊन बसला आहे कीं तो सोडून देणें त्याला शक्यच नाहीं. ज्याप्रमाणें देहादि इंद्रियें हीं त्याच्या जीविताला आवश्यक आहेत, त्याचप्रमाणें धर्मविचारही त्याला आवश्यकच आहे. देह गेला, मन नष्ट झालें, विचारसामर्थ्य लोपलें आणि जीवित संपलें तरच धर्मविचारही बंद पडेल. एखादा तरी विचार उत्पन्न होत आहे तोपर्यंत बरेवाईट आणि पाप- पुण्य इत्यादि द्वंद्वांतून मनाला मुक्त करणे शक्यच नाहीं; आणि हें द्वंद्व - भांडण- शिल्लक असेपर्यंत कोणत्या तरी प्रकारचा धर्म त्याला आवश्यक आहेच. यामु ळेंच जगांत अनेक धर्मोची उत्पत्ति झाली आहे. या अनेक धर्मात प्रचलित असणाऱ्या अनेक प्रकारच्या विचारपरंपरांची यथायोग्य संगति लावणें हैं अत्यंत विकट कर्म आहे ही गोष्ट खरी; तथापि धर्मज्ञानसंपादनाचा यत्न करणें म्हणजे मृगजलाचा पाठलाग करण्यासारखेंच आहे असें जें आपणां- पैकीं पुष्कळांस वाटतें तें मात्र बरोबर नाहीं. धर्मविचारांत कितीही घोंटाळा असला आणि परस्परविरोधाचा दृश्याभास असला, तरी या घोटाळ्याच्या पोटांत अत्यंत एकतानता आहे. एखाद्या तंतुवाद्यांतील पांचसहा तारा प्रत्येक निर- निराळा सूर काढीत असल्या, तरी ज्याप्रमाणें त्या सर्व सुरांचा एकमेळ असतो, त्याप्रमाणेंच या अनेक धर्मविचारांचीही बाब आहे. त्यांतील एकतानतेच्या रसाचा आस्वाद घेण्याला कान मात्र तयार केले पाहिजेत.
 सध्याच्या काळीं धर्मज्ञानासंबंधी एक विशेष प्रश्न उपस्थित झाला आहे; आणि त्याचा विचार प्रथम करणें अवश्य आहे. "विश्वाच्या उत्पत्तीच्या आरंभी काय होते आणि विश्व नष्ट झाल्यावर काय होईल, हें जर आपणांस सांगतां येत नाहीं विश्व या मध्याचें आद्यवसान जर आपणांस अज्ञात आहे असे मानलें, तर या अज्ञात प्रदेशांत भटकत फिरण्याचें आम्हांस प्रयो- जन तरी काय आहे ? सध्याच्या काळीं तर हा प्रश्न विशेषच जोरानें उप- स्थित झाला आहे. जें कांहीं समोर दिसतें त्यांतून शक्य तितक्या मोठ्या सुखाची प्राप्ति करून घेऊन स्वस्थ राहणें वावगे आहे काय ? अथांग समु द्राच्या पोटांत बुड्या मारण्यांत, दम कोंडण्यापेक्षां अधिक फायदा तो काय होणार ? 'खाना पीना सुखसे सोना'हेच आपणांस युक्त नाहीं काय?  स्वा. वि. खं. ३-६.