पान:विवेकानंद.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
स्वामी विवेकानंद यांचे समन ग्रंथ.

[ तृतीय


उराशी बाळगून ठेवला आहे. हिंदु राष्ट्राची नीति आणि उपदेश यांचा पाया हे दोनच ग्रंथ होत. आर्यांचा जीवनक्रम आणि सद्गुण ज्यांत एकत्र सांठवि- लेले आहेत असे हे दोन विश्वकोशच आहेत. मानवकुलाची अत्युच्च संस्कृति कोणत्या प्रकारची असावी हें दाखविणारे हे दोन आदर्श होत. यांत दाख- विलेल्या मार्गानें आपल्या संस्कृतीची रचना करण्याचा यत्न करावा इतकीही योग्यता सध्याच्या मानवजातीस प्राप्त झाल्याचे दिसत नाहीं.