पान:विवेकानंद.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

७७


 युधिष्ठिराच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात न पडतात तोंच तो कुत्रा यमधर्माच्या रूपानें प्रकट होऊन म्हणाला, “राजा, तुझी धन्य असो ! तुझ्या- इतका अहंभाव विसरलेला दुसरा मनुष्य मी पाहिला नाहीं. यःकश्चित् कुत्र्या- साठीं स्वर्गभोगही टाकायाला तूं तयार झालास, इतकेच नव्हे तर त्याला स्वर्ग देण्यासाठीं तूं नरकवास भोगावयासही तयार झालास. धन्य ! धन्य !! तुझ्या जन्माचें सार्थक झालें !!! सर्वांभूर्ती दया कशी ठेवावी हें तूंच आपल्या उदाहर णानें सर्वांना शिकविलेंस ! तुझ्या सारख्यासाठीं स्वर्गद्वारें बंद कशीं होतील? स्वर्गच काय, पण त्याहूनही उत्तमोत्तम लोक तुझ्या वासाकरितांच निर्माण झाले आहेत. तुझ्या राहण्यानें ते लोकच धन्य होतील. तूं त्या लोकांचा जेता. आहेस.
 नंतर इंद्र, यमधर्म, युधिष्ठिर आणि इतर देव रथारूढ होऊन स्वर्गाला गेले. तेथें युधिष्ठिरानें स्वर्गगेचें स्नान केलें. नंतर देवाचा देह त्याला प्राप्त झाला. तेथे त्याच्या बंधूंची व त्याची गांठ पडून ते सर्व अमर होऊन राहिले, आणि सर्व सुखमय झालें.
 याप्रमाणे महाभरतांतील कथाभाग आहे. सद्गुणांचा विजय आणि दुर्गुणांचा पाडाव हे यांतील मुख्य रहस्य आहे.
 महाभारतांतील महावीरांची उदात्त दानत जशी भगवान् श्रीव्यासांनीं आपल्या अमोघ वाणीनें मुळांत दाखविली आहे, तशी आपल्यापुढे मांडणें मला केवळ अशक्य आहे. सदुपदेश आणि पुत्रस्नेह यांच्या द्वंद्वांत सांपड- लेला आंधळा, वृद्ध आणि दुबळा धृतराष्ट्र; धीर पुरुषाला उचित अशा दान- तीचा पितामह भीष्म; उदार आणि महात्मा क्षत्रियकुलावतंस राजा युधिष्ठिर; त्याचे शूर आणि एकनिष्ठ बंधू; महाज्ञानी भगवान् श्रीकृष्ण; त्याचप्रमाणें पतिनिष्ठ राणी गांधारी; वात्सल्ययुक्त कुंती, पतिपरायण आणि सर्व प्रकारच्या संकटांत एकनिष्ठ असणारी द्रौपदी, इत्यादि शेंकडों पात्रें यथास्थित रंगविण्या श्रीव्यासांसारखीच बुद्धिमत्ता पाहिजे. त्यांचें योग्य वर्णन करणे माझ्या शक्ती- बाहेरचें काम आहे. आमच्या पूर्वजांनी जर कांहीं चिरकाल टिकणारा वारसा मागें ठेवला असेल तर तो रामायण आणि महाभारत यांतील शेकडों स्त्रीपुरु- षांचा आदर्श हाच होय. आज हजारों वर्षे हा वारसदारीचा हक्क आम्ही