पान:विवेकानंद.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


पिही आपल्यामागें येत असल्याचे त्याला आढळून आलें. बर्फाचे पर्वत तुड- वीत तुडवीत राजा युधिष्ठिर व तो कुत्रा असे चालू लागले. चालतां चालतां ते मेरुपर्वतापाशीं येऊन पोहोचले. त्या ठिकाणीं स्वर्गीय घंटांचा नाद त्यांस ऐकूं येऊं लागला. देवांनीं युधिष्ठिरावर पुष्पवृष्टि केली. नंतर इंद्राचा रथ खालीं आला व आंत बसलेला इंद्र म्हणाला, 'महाराज, या रथांत आरूढ व्हावें. सदेह स्वर्गवास भोगण्याचा अधिकार फक्त आपलाच आहे." पण आपले बंधू व पत्नि यांशिवाय स्वर्गवास पतकरण्याचें युधिष्टिर कबूल करीना. तेव्हां ती सर्व मंडळी अगोदरच पुढे गेली आहे असें इंद्राने त्याला सांगितलें; तेव्हां तो कुत्र्याकडे वळून म्हणाला, “वाळा, चल रथांत बैस. " हे ऐकून इंद्र चकित होऊन म्हणाला, “काय, कुत्र्याला रथांत बसवितां? छे छे. कुत्रा स्वर्गात कसा जाईल ? महाराज, हे आपण भलतेच काय आरंभिलें आहे ? आपणास बुद्धि- अंश तर झाला नाहीं ? आपण सर्व मानवकुलांत श्रेष्ठ आहां. आपण सदेह स्वर्गास जावें हें योग्यच आहे; पण कुत्रा तेथें कसा प्रवेश करील?" युधिष्ठिर म्हणाला, " तो बिचारा येथवर मजबरोबर आला. येथवर त्याने मला आपल्या सोबतीचा लाभ दिला. बर्फातून आणि अनेक प्रकारच्या संकटांस न जुमानतां तो मजबरोबर आला. माझ्या भावांनीं आणि पत्नीनें मला सोडिलें, त्यावेळीं त्यानेंच मला साथ दिली. आतां त्याचा त्याग मी कसा करूं ? " इंद्र म्हणाला, “हें भलतेंच कसें होईल ? कुत्रीं बरोबर घेऊन येणारांस स्वर्गाचीं द्वारें उघ- “डली जात नाहींत. यासाठी त्याला आतां येथेंच राहू द्या. त्याला मार्गे ठेव- ण्यांत कांहीं पाप नाहीं. " युधिष्ठिर निक्षून म्हणाला, "त्याच्याशिवाय मी स्वर्गास जाणार नाहीं. ज्यानें संकटाचे वेळींसुद्धां माझी पाठ सोडली नाहीं त्याचा त्याग प्राणांतींही मी करणार नाहीं. स्वर्गभोग मला नकोत. अकर्म करून मिळणारे भोग मी त्याज्य समजतों. " इंद्र म्हणाला,"हा कुत्रा फार पापी आहे. जन्मभर यानें हिंसा केली आहे. दुसऱ्यांचा जीव घेऊन यानें आपला जीव बचावला आहे. जर तो स्वर्गाला जावा अशी आपली इच्छा असेल तर त्याला एकच उपाय आहे. आपण अत्यंत पुण्यशील आहां.आपण आपले सर्व पुण्य त्याला देत असलां व त्याचें पाप घेत असला तर मात्र तो स्वर्गाला जाईल." युधिष्ठिरानें उत्तर दिलें “ही फार चांगली तोड आहे. या गोष्टीला मी कबूल आहे. आपण या कुत्र्याला घेऊन स्वर्गास जा."