पान:विवेकानंद.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

७५


दुःख झालें. आतां आपला काळही समीप येत चालला असें त्यांस वाटलें. त्यांनी सर्व राजभूषणांचा आणि राज्याचाही त्याग करून अर्जुनाचा नातू परीक्षित् यास सिंहासनावर बसविलें, व ते हिमालयाकडे चालते झाले. तेथें त्यांनी महाप्रस्थान ठेवलें. महाप्रस्थान म्हणजे एक प्रकारचा संन्यासच होय. वृद्धपणीं सर्व राजांनी संन्यासग्रहण करावें अशी चाल हिंदुस्थानांत होती. ही चाल केवळ राजापूरतीच होती असें नाहीं. प्रत्येक वृद्ध गृहस्थ बहुधा संन्यासी होत असे. ज्याची संसारावरील आसक्ति सुटली असेल असा वृद्ध गृहस्थ हिमालयाकडे जाई व अन्नपाणी न घेतां एकसारखा चालत राही. शेवटीं चालतां चालतां देह थकला म्हणजे तो कोठें तरी खालीं पडे. चालत असतां परमेश्वराशिवाय दुसरा कोणताही विचार तो मनांत आणीत नसे.
 नंतर अनेक देवदेवता व ऋषी युधिष्टिराकडे आले व त्यांनीं युधिष्ठिराला स्वर्गाला जाण्याबद्दल सांगितलें. हिमालयपर्वताच्या अतिशय उंच शिखरांपली- कडे मेरुपर्वत असून त्या पर्वताच्या शिखरावर स्वर्गलोक आहे. मानवदेही असतां कोणीही तेथें जाऊं शकत नाहीं. त्या ठिकाणी फक्त देवांची वस्ती आहे.. देवांनींच युधिष्ठिराला तेथें राहावयास बोलाविलें.
 देवांच्या आज्ञेप्रमाणें पांच पांडव व द्रौपदी यांनी वल्कलें नेसून मेरुपर्व- ताचा मार्ग धरला. ते मार्ग चालत असतां एक कुत्रा त्यांजबरोबर चालू लागला. चालतां चालतां हिमालयाच्या उत्तुंग शिखरांजवळ तीं सर्व आली. तेथून त्यांस मेरुपर्वताचें दर्शन झालें. बर्फातून तीं पुढें चालू लागलीं. चालतां चालतां द्रौपदी एकदम खाली पडली व गतप्राण झाली. युधिष्ठिर सर्वोच्या अघाडीस चालला होता, त्याला हाक मारून भीम म्हणाला, "द्रौपदीचा देह -- पात झाला.” हे ऐकून युधिष्ठिराला फार वाईट वाटलें; पण त्यानें मागें पाहिलें नाहीं. तो म्हणाला,“आतां कृष्णदर्शनाकरितां आपण जात आहों. आतां. मागें पाहायला वेळ नाहीं. पुढें चालू लाग. पुढें थोड्या वेळाने सर्वात धाकटा भाऊ सहदेव पडला. भीमानें ती गोष्ट युधिष्ठिराला सांगतांच तो म्हणाला, "पुढें चल".
 अशा रीतीनें युधिष्ठिराचे चौघे भाऊ एकामागें एक पडत गेले व शेवटीं तो एकटाच पुढे चालू लागला. भावांच्या मृत्यूमुळे तो हताश झाला नाहीं. पुढे चालतां चालतां त्यानें सहज मागे वळून पाहिलें तो पूर्वीचा कुत्रा अद्या-