पान:विवेकानंद.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


चरित्रांतील साम्य येथेंच संपते. यानंतरची त्यांची चरित्रे एकमेकांहून निराळ्या दिशांनीं गेली आहेत. भगवान् श्रीकृष्णानें कंसराजाचा वध केला, तथापि स्वतः सिंहासनाचा स्वीकार केला नाहीं. आपणांस सिंहासन असावें या हेतूनें त्यानें तें कर्म केलेंच नव्हतें. दुष्टांचा नाश करणें एवढाच त्याचा कार्यभाग होता आणि तो त्याने केला. तेथेंच त्याचें कर्तव्य संपलें.
 महाभारतीय युद्धांत भीष्मपितामहांनी दहा दिवस सेनापत्य केलें आणि नंतर ते जखमी होऊन पडले. युद्ध संपल्यानंतरही ते जिवंत होते. त्यांनी राजा युधिष्ठिराला अनेक विषयांवर उपदेश केला. राजांचे कर्तव्य काय, चातु- वण्याचे कर्तव्य काय, प्रत्येकाच्या जीवनक्रमांतील चार आश्रम, विवाह, गृहस्थाश्रमाचे नियम आणि दानादि क्रिया इत्यादि अनेक विषयांसंबंधी त्यांनी युधिष्ठिराला उपदेश केला. पूर्वकालीन ऋषि आणि महात्मे यांच्या उपदेशाचें रहस्य या उपदेशाच्याद्वारे त्यांनीं युधिष्ठिराला कथन केलें. सांख्यदर्शन, योग आणि इतर दर्शनें यांचा ऊहापोह त्यांनी केला. त्याचप्रमाणें अनेक राजे आणि ऋषी यांजबद्दलच्या कथाही त्यांनी सांगितल्या. या कथाभागाला एकंदर ग्रंथाचा चतुर्थांश खर्ची पडला आहे. आर्यांची संस्कृति, त्यांचे कायदे व त्यांची नीति यांजबद्दल या कथाभागावरून बरेंच अनुमान होण्याजोगे आहे. यानंतर युधिष्ठिराला लौकरच राज्याभिषेक झाला; तथापि या युद्धांत जो भयंकर प्राणनाश झाला, त्यामुळे त्याचें चित्त बरेंच अस्वस्थ असे. नंतर व्यासांच्या सांगण्यावरून त्यानें अश्वमेध नांवाचा एक महायज्ञ केला.
 युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्र पंधरा वर्षे राजधानीत होता. युधिष्ठिर आणि त्याचे चौघे भाऊ त्याच्या आज्ञेत वागत असत व त्याचा मानमरातब त्यांनीं चांगला राखला होता. नंतर सर्व कारभार युधिष्ठिराकडे सोपवून तो आपली पत्नी गांधारी व पांडवांची माता कुंती यांसह अरण्यवासांत जाऊन राहिला. युधिष्ठिराला सिंहासनावर बसून छत्तीस वर्षे झाल्यावर भगवान् श्रीकृ- कृष्णांनीं अवतारकार्य संपविल्याची बातमी त्याला समजली. त्याचें सर्व वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणें होत असे. ती बातमी ऐकून अर्जुन द्वारकेला गेला व परत येऊन ती बातमी खरी असल्याचें त्यानें युधिष्ठिराला सांगितले. कृष्णाच्या निर्वाणाच्या अगोदर सर्व यादवकुलाचाही संहार झाला होता. कृष्ण- निर्वाणाची बातमी ऐकून युधिष्ठिर, अर्जुन व दुसरे पांडव यांस परमावधीचें