पान:विवेकानंद.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

७३


सांगितलेले कर्मरहस्य. कर्म करीत असतांही अकर्माची शांति आणि कर्म करीत नसतांही अत्यंत कर्मप्रवणता अंगी कशी आणावी हें त्यानें आह्मांस स्वतःच्या उदाहरणानें शिकविलें. कर्म करीत असतांही तें अनासक्त चित्तानें केलें-कर्म- फलाची इच्छा ठेवली नाहीं-ह्मणजे त्याजपासून उद्भवणारी सुखदुःखें भोग- ण्याचेंही कारण नाहीं, हे त्यानें शिकविलें आणि आचरूनही दाखविलें. 'तुझी स्वतः शुद्ध आणि मुक्त आहां. तुम्हीं केवळ साक्षी आहां. दुःखाची प्राप्ति कर्मामुळे होत नसून फलासक्तीमुळे होते. ' हा त्याच्या सांगण्यांतील मुख्य मुद्दा आहे. पैसा मिळवावासा वाटत असेल तर खुशाल पैसा मिळवा. तो मिळविण्याकरितां हवा तितका उद्योग करा; पण त्या पैशाशीं एकजीव होऊन बसूं नका. याचप्रमाणे आईबाप, वायकामुलें, इष्टमित्र, गणगोत, कीर्ति इत्या- दिकांबद्दलही समजावें. चित्तांत आसक्ति ठेवावयाची ती फक्त परमेश्वराबद्द- लच ठेवावयाची. इष्टमित्रादिकांसाठीं कर्म करा; त्यांजवर प्रेम असूंया; त्यांच्या बऱ्यासाठीही झटा; इतकेंच काय पण त्यांच्या कार्यासाठी एक वेळ सोडून शंभर वेळ प्राणत्याग करावा लागला तरी करा; पण हे करीत असतांही त्यांजबद्दल आसक्ति ठेवू नका. या आपल्या मेहनतीचें फळ अमुक प्रकारचें मिळावें अशी इच्छा ठेवू नका हें भगवान् श्रीकृष्णाचें सांगणें आहे. त्याचें सर्व चरित्र ह्मणजे या उपदेशाचें जिवंत उदाहरणच आहे.
 भगवान् श्रीकृष्णाचें चरित्र ज्यांत लिहिले आहे तें पुस्तक लिहिलें गेल्याला हजारों वर्षांचा काळ लोटून गेला आहे. कृष्णचरित्राच्या कांहीं भागाचें ख्रिस्त- चरित्राशीं अत्यंत साम्य आहे. भगवान् श्रीकृष्णाचा जन्म राजकुलांत झाला. कंस या नांवाचा एक अत्यंत जुलमी राजा त्याकालीं होता. श्रीकृष्ण हा त्याच्या बहिणीचा मुलगा. त्याच्या बहिणीचा मुलगा त्याचा वध करील असें भविष्य त्याला सांगितलें होतें. बहिणीच्या सर्व मुलांना ठार मारावें असा हुकूम त्यानें केला होता. आपली बहीण आणि तिचा पति यांस त्यानें तुरुंगांत ठेवलें होतें. भगवानाचा जन्म तुरुंगांतच झाला; त्यावेळी मोठा प्रकाश पडला आणि तें तान्हें मूल म्हणालें, “मी जगाचा प्रकाश आहें; जगाच्या कल्याणासाठीं मीं जन्म घेतला आहे. " भगवान् श्रीकृष्णाला गोपाल अर्से नांव आहे. गोकुलांत त्यानें गाई राखल्या. त्यावेळच्या मोठमोठ्या ऋषींनीं ' हा परमेश्वराचा अवतार' असें ह्मणून त्याला वंदन केलें. भगवान् श्रीकृष्ण आणि भगवान् ख्रिस्त यांच्या