पान:विवेकानंद.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर दोन्ही सैन्य एकत्र जमलीं असतां हा अक्षय्य ग्रंथ निपजला. ज्यांनीं गीता वाचली नसेल त्यांनीं ती एकवार तरी अवश्य चाचावी, अशी माझी विनंति आहे. तुम्हां अमेरिकन लोकांवर या ग्रंथाचा किती परिणाम झाला आहे याची थोडीतरी कल्पना तुम्हांस झाली तर खरो- खर आश्चर्यानें तुह्मी थक्क व्हाल ! प्रख्यात अमेरिकन तत्त्ववेत्ता इमरसन याच्या ठिकाणीं गीतेनेंच स्फूर्ति निर्माण केली ! तो एके वेळीं कार्लाइल यास भेटाव- .यास गेला असतां त्याने इमरसनला गीतेची एक प्रत नजर केली. या लहानशा पुस्तकानेंच अमेरिकेत मोठी क्रांति घडवून आणिली आहे. अमेरिकेंतील अनेक प्रकारच्या चळवळींचें मूळ गीतंतच आहे.
 भगवान् श्रीकृष्ण हे गीतेंतील प्रमुख पुरुष होत. ज्याप्रमाणें भगवान् येशु ख्रिस्त हा परमेश्वराचाच अवतार आहे असे तुम्ही समजतां, त्याप्रमाणेंच आह्मी हिंदुलोक परमेश्वरानें कित्येक अवतार धारण केले असें समजतों. अव तार एक दोनच झाले असें नसून, ज्या ज्या वेळीं पृथ्वीवर अधर्म माजतो त्या त्या वेळी परमेश्वर अवतार घेऊन, सज्जनांचें रक्षण आणि दुष्टांचें निर्दलन करतो असें आह्मी समजतों. असे अवतार आजपर्यंत पुष्कळ झाले आहेत. परमेश्वराच्या या सर्व अवतारांत श्रीकृष्ण हाच अधिक पूज्य समजला जातो. इतर अवतारांच्या भक्तांपेक्षां कृष्णभक्तांची संख्याच हिंदुस्थानांत अधिक आहे. भगवान् श्रीकृष्ण हा पूर्णावतार होता असा आमचा समज आहे. बुद्ध चगैरे इतर अवतार त्यागी होते. त्यामुळे संसारी लोकांबद्दल त्यांच्या चित्तांत फारशी अनुकंपा नव्हती. ते स्वतः संन्यस्त वृत्तीचे असल्यामुळे संसारी मनु- व्यांबद्दल त्यांच्या मनांत सहानुभूति उद्भवणें शक्यच नव्हते. पण श्रीकृष्णाची गोष्ट याहून वेगळी आहे. तो स्वतः संसारी होता. त्यागी नसून भोगी होता. तो स्वतः राज्यकर्ता होता. त्याला मुलेबाळें होतीं. सर्व प्रकारचे आप्तसंबंधी आणि मित्र त्याला होते. या सर्वोमध्यें राहून आणि या सर्वांचे वेगवेगळे संबंध लक्ष्यांत आणून त्यानें आह्मा संसारी लोकांस उपदेश केला; इतकेंच नव्हे तर त्या उपदेशाचा प्रत्यक्ष आचार कसा असतो हेंहि त्यानें स्वतःच्या उदाहरणानें आह्मांस शिकविलें. आम्हा संसारी मनुष्यांस कर्म करणे भाग आहे हे जाणून त्यानें आम्हांस कर्मरहस्य सांगितले. 'कर्मण्यकर्म यः पश्ये- दकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान् मनुष्येषु सयुक्तः कृत्स्रकर्मकृत् ' हें त्यानें